जिल्हा परिषद चिल्हे शाळेत चिमुकल्यांच्या खाऊ गल्लीचा बाजार, वर्गासह ग्रामस्थ महिलांनी घेतला चविष्ट पदार्थांचा आस्वाद

.
कोलाड | श्याम लोखंडे 
रायगड जिल्हा परिषद शाळा चिल्हे येथील चिमुकल्यांनी शालेय एकदिवस अनोखा उपक्रम राबवत केला साजरा शाळेत शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी यांच्या वतीने महिलांना हळदी कुंकू तसेच शाळेत बाळ आनंद बाजार म्हणून खाऊ गल्ली तयार करून त्यात छोटी छोटी दुकाने थाटली विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनून एक उत्तम व्यवहारातील उपक्रम म्हणून विदयार्थी वर्गासाठी विक्रीस मांडले होते. तर तयार केलेल्या चविष्ट पदार्थांचा उत्तम आस्वाद विदयार्थी वर्गाने तसेच पालक ,शिक्षक, व उपस्थितीत ग्रामस्थ माता महिलांनी घेतले तर येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अनोख्या उपक्रमाचे साऱ्याने कौतुक केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणी कांदे पोहे, वडा पाव, ताक लस्सी, भाजी, ॲपे, सुकी भेळ, फाटक कांदा भजी, लिंबू सरबत, कोकम सरबत चायनीस भेळ,केली,फळे, विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ बनून विक्री केली तर विक्रीतून मिळाले पैसे आनी त्यातून त्यांना मिळाले व्यवरातील एक ज्ञान अथवा गणिताची बेरीज त्यामुळे त्यांच्या बुद्दिमतेला एक अनोखा अनुभव यातून प्राप्त झाले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा अशोक गायकवाड ,शिक्षक शरद पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र महाडिक, उपाध्यक्षा मेघना महाडिक तसेच इयत्ता 1 ली ते 4 थी च्या सर्व विद्यार्थ्यांनी खाऊ बाजार उपक्रमात आवडीने सहभाग घेतला.विद्यार्थी वर्गाने आयोजित केलेल्या बाळ आनंद बाजार खाऊ गल्ली यात विविध प्रकारचे बनविलेले चविष्ट पदार्थ याचा आस्वाद अल्प दरात उपस्थित विद्यार्थी वर्गाला व आलेल्या ग्रामस्थ महिलांना मिळाला.
मोठया उत्साही आणि आनंददायी वातावरण विद्यार्थ्यांनी केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करत कोणी कांदे पोहे, बटाटे वडे, भेल, भजी,फळे, मटा, कोकम सरबत अशा विविध प्रकारच्या खाऊंचा स्वाद साऱ्या उपस्थित महिलांनी खाऊ बाजार गल्लीत घेतला तर उपक्रमातून मिळालेला विद्यार्थ्यांना आर्थिक उलाढालीत मदत त्यातून त्यांची बुद्धिमत्ता आणि गणिताचे साधन बनले आणि त्यातून एक व्यवाहारी ज्ञान आत्मसात केले.