जीवनात चांगले कर्म करा, निश्चितच फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही- हभप दत्तात्रेय ढेणे

कोलाड | श्याम लोखंडे 
माणसाने जीवनात चांगले कर्म केले तर फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी देवाळा भजा त्याची भक्ती करा.आपल्या मनाने काही वाईट केलेले कर्म आपण केलेल्या कर्माचे भोग आपणच भोगले पाहिजे लोखंडे भावकी आणि लोखंडे कुटुंबियांच्या वतीने कुलदैवाचे वर्धापनदिन आणि श्री सत्यनारण महापूजा या कार्यक्रमाचे आयोजन केले ते नित्यनेम करत असलेली सेवा आणि त्यातून जर का काही नकळत चूक घडलेली असेल तर त्याचा भार हे नारायणा तुझ्यावर टाकत आहोत त्यामुळे येणाऱ्या सर्व संकटातून तूच आम्हाला सावर आणि आमच्या कुटुंबाचा सांभाळ कर हीच भावना आहे त्यामुळे जीवनात चांगले कर्म केल्याने फळ निश्चितच मिळेल मत वै.सद्गुरू पुरुषोत्तम महाराज यांचे शिष्य हभप दत्तात्रेय महाराज ढेणे पेण यांनी कीर्तनरुपी सेवेतून केले.
सलाहाबाद प्रमाणे रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे लोखंडे भावकीच्या कुलदैवताचे वर्धापनदिन आणि सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते किर्तन सेवेत मार्गदर्शनातून करत होते.
भोग तो न घडे संचितावाचूनि । करावे ते मनी समाधान ।। म्हणउनि मनी मानू नये खेदु । म्हणावा गोविंदु वेळोवेळा ।। आणिका रुसावे न लगे बहुता । आपुल्या संचितावाचुनिया ।। तुका म्हणे भार घातलियावरी । होईल कैवारी नारायण ।। जगतगुरु जगतवंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगरुपी सेवेतून ते विवेचन करतांना पुढे म्हणाले की श्री संत तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याच्या वाट्याला येणारे भोग हे त्याच्या संचितामुळे, पूर्व कर्मांमुळे असतात. त्यामुळे ते भोगतेवेळी ते त्याने समाधान चित्ताने भोगावेत. किंबहुना आपल्याच पूर्वकर्माचे ते फळ असल्याने त्याविषयी मनात किंचितही खेद मानू नये. उलट अशावेळी वाचेने त्या एका श्री हरी गोविंदाचे नाम घ्यावे, त्याच्या नामाचा जयघोष करावा आणि मुख्य म्हणजे आपण भोगत असलेले भोग आपल्याच प्रारब्धाचे फळ असल्याने त्या भोगांना कंटाळून किंवा त्याचा मनस्ताप म्हणून इतर कोणावरही रुसू नये किंवा कोपू नये किंबहुना रुसावे लागल्यास त्याने आपल्या दैवावरच रुसावे. म्हणजे एका आपल्या नशिबाशिवाय किंवा संचिताशिवाय अन्य कोणावरही रुसू नये.
तुकोबाराय शेवटी म्हणतात परंतु ह्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो. म्हणजेच अशा परिस्थितीतून सहीसलामत सुटण्यासाठी मी तुम्हांला एक युक्ती सांगतो. ते म्हणतात देवाला श्रद्धेने शरण जाऊन जर एखाद्याने आपला संपूर्ण भार त्याच्यावर टाकल्यास मग देवालाही तो स्वतःच्या खांद्यावर घ्यावाच लागतो आणि शरण आलेल्यांचे रक्षण करावेच लागते . कारण ते म्हणतात शरण आलेल्यांना नारायण कधीही रिकाम्या हाताने धाडत नाही उलट त्यांचा कैवार घेऊन, त्यांना पाठीशी घालून किंबहुना त्यांचा संपूर्ण अंगीकारच करून त्यांचे सर्व भोग मग तो स्वतःच भोगतो.असे शेवटी पटवून देत भक्ती करा चांगले कर्म करा निश्चितच फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगत त्यांनी वै. हभप बापू यांच्या सेवा कीर्तनाच्या आठवणीना उजाळा दिला.
या प्रसंगी लोखंडे भावकी च्या वतीने कुलदैव वर्धापनदिनानिमित्ताने सकाळी कुलदैवत मूर्तींवर विधिवत पद्धतीने पुरोहित गजाननस्वामी जंगम यांच्या मंत्र पठणाने दुग्ध जलाभिषक तद्नंतर सत्यनारायण महापूजा आरती दुपारी महाप्रसाद, सायंकाळी पाच ते सहा हभप निवृत्ती महाराज लोखंडे यांचे प्रवचन तद्नंतर चिल्हे ग्रामस्थ व खांब पंचक्रोशी यांचे संपूर्ण हरिपाठ व सात ते नऊ या वेळेत हभप दत्तात्रय देणे यांचे सुश्राव्य किर्तन रात्रौ महाप्रसाद भजन असे धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
यावेळी हभप प्रकाश महाराज थिटे, मोरेश्वर महाराज मरवडे, मृदुंगमणि हर्षल महाराज गायनाचार्य चंदन महाराज पाटील, मनोहर महाराज कदम,नितीन कचरे, निलेश कचरे, गोठम, विशाल लोखंडे, सुदान कचरे, सहदेव महाडिक, शांताराम महाडिक,सहदेव बाईत, खांबकर , महादेव माहित, गणेश जाधव, रघुनाथ कोस्तेकर, धनाजी महाडिक, तुकाराम महाडिक, रमेश वाळंज, मयुर शिंदे, शंकर मरवडे, मारुती खांडेकर, सखाराम कचरे,कृष्णकांत धनवी, होनाजी कोल्हटकर, सह खांब पंचक्रोशीतील असंख्य भाविक चिल्हे ग्रामस्थ महिला वर्ग तसेच आदी लोखंडे भावकी उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोखंडे भावकीने अथक परिश्रम घेतले.