अलिबाग तालुक्यातील भाकरवड गावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार, श्री जीवन दत्तात्रेय पाटील यांना सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, रायगड अधीक्षक आँचल दलाल , जिल्हाधिकारी किशन जावळे, उपनगराध्यक्ष अँड मानसी म्हात्रे , शिवखरे सर, रिलायन्स इंडस्ट्रीज चे डांगी सर , रमेश धनावडे, आदी मान्यवरांच्या हस्ते रायगड सुरक्षा अंतर्गत जीवनदूत पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले. श्री जीवन दत्तात्रेय पाटील हे सण 2008 पासून मनस्वी मानव सेवेच्या माध्यमातून वारस बे वारस मृत्यू देह यांची विनामूल्य सेवा करत आहेत त्यांनी आज पर्यंत 174 मुर्तू देहांची पोलिसांच्या सहकार्याने विल्येवाट लावली आहे कोणताही अपघात झाला की जीवन पाटील त्यांच्या कडील असलेली अँब्युलन्स घेऊन तात्काळ अपघातस्थळी जाऊन मदतकार्य करतात . तर आजपर्यंत 450 हून अधिक अपघात ग्रस्तांचे प्राण वाचवले आहे त्यांनी रुग्णाहिका पोयनाड येथील पेझारी चेक पोस्ट येथे सेवेसाठी ठेवली आहे ती गरीब गरजू लोकांना कधीही रात्री बे रात्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जीवन पाटील यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत रायगड भूषण, जीवन गौरव, समाज भूषण, समाज रत्न, ग्रीन फाऊंडेशन ग्रीन वल्ड , पोयनाड भूषण, पोयनाड पंचक्रोशी जीवन गौरव, ज्ञानसंकल्प पुणे जीवन गौरव, लोकसेवा आयोग कोल्हापुर आदर्श कार्य गौरव पुरस्कार , कुशल नेतृत्व जननायक , श्रमजिवी जीवन गौरव पुरस्कार, आदर्श समाज भूषण,लहुजी शक्तिसेना कोविड योद्धा पुरस्कार , अलिबाग नगरपालिका कोविद योद्धा, महात्मा ज्योतिबा फुले समयदुत पुरस्कार , रायगड जिल्हा सागरगड शेतकरी संघटना समाज गौरव , 2024 चा उरण येथील मानाचा द्रोणगिरी जीवन गौरव पुरस्कार , रायगड जिल्हा वाहतूक विभाग 2025 चा जीवन दूत पुरस्कार असे ऐकून 58 पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे . त्यांना नुकताच 2026 सालचा रायगड सुरक्षा अभियान अंतर्गत मानाचा जीवनदूत. पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .नावात जीवन असणाऱ्या जीवन पाटील यांना जीवनदूत पुरस्कार देऊन गौरव होत आहे ही त्यांच्या परिवारासाठी , भाकरवड गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यांच्यावर अनेक स्तरातून कौतुकाची थाप पाठीवर पडत आहे तर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.