रायगड जिल्ह्यातील महत्वाचे व मध्यवर्ती असलेले येथील एस.टी. स्थानकाची अवस्था दैनिय झाली असून या स्थानकाच्या आवारात चिखल युक्त डबक्यांचे स्वरूप निर्माण झाले आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांचा प्रवास हा चिखल युक्त पाण्यातून होणार असून त्या खड्डयातील साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना ये जा करावी लागते तसेच गाडीमध्ये चढता उतरताना त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच आवारात येणार्या बेसेस डबक्यातून गेल्यावर उडणारे चिखलयुक्त पाणी तसेच त्यामध्ये असलेला एकादा दगड उडून प्रवाश्यांना दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.सदरील ठिकाणी निदान सण उत्सवाच्या काळात तरी खड्डे भरावेत अशी माफक अपेक्षा प्रवाशी वर्गांची आहे.
येथील एस.टी .स्थानक म्हणजे नागोठणे विभाग व राज्य परिवहन मंडळाचे मध्यवर्ती ठिकाण असून विभागातून शहरात रोज हजारो लोक खरेदी विक्री व इतर कामांकरीता येत जा करीत असतात. त्यांना प्रवासाचे मुख्य वाहन म्हणजे एस.टी. बसेस तसेच या परिसरात अनेक कंपन्या असून येथील कामगार व शहरातून कामानिमित्त मुंबई, श्रीवर्धन,महाड – पोलादपूरसह कोकणात गावी जाण्यासाठी प्रवास करणार्या प्रवाशांची बस स्थानकात कायम थोड्या फार फरकाने गर्दी असते.त्यातच गणेशोत्सव सुरू होत असल्याने खरेदी तसेच गणेश दर्शनासाठी प्रवास करणारे गणेश भक्त येथूनच एस.टी. बसने प्रवास करतेवेळी त्या खड्डयातील साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना ये जा करावी लागते तसेच गाडीमध्ये चढता उतरताना त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच आवारात येणार्या बेसेस डबक्यातून गेल्यावर चिखलयुक्त पाणी उडून कपडे खराव होणार असून प्रवाशांची आवस्था तळ्यात मळ्यात झाली असून सदरील ठिकाणी निदान सण उत्सवाच्या काळात तरी खड्डे भरावेत अशी माफक अपेक्षा प्रवाशी वर्गांची आहे.
——————————————–
खड्डे भरण्याबाबत रोहा आगार व्यव्स्थापकांकडे पत्रव्यवहार केला आहे – येथील स्थानकात भरपूर खड्डे पडले असून येथून बस पकडण्यासाठी येणारे शालेय विद्यार्थी व प्रवाशी यांना खूप मोठी अडचण होत आहे. तसेच तेथे अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदरील ठिकाणचे खड्डे भरण्याची व्यवस्था करावी असा पत्र व्यवहार रा.प. रोहा आगार व्यवस्थापकांना 08 सप्टेंबर रोजी केला आहे.