मुंबई-गोवा महामार्गावर धोकादायक रसायन वाहतूक करणारा कंटेनर पलटी; यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

मुंबई-गोवा महामार्गावर धोकादायक रसायन वाहतूक करणारा कंटेनर पलटी
कोलाड | श्याम लोखंडे
मुंबई गोवा महामार्गावर मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास, जेएनपीटी येथून महाडच्या दिशेने जाणाऱ्या धोकादायक रसायनाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा पुगाव गावाच्या हद्दीत अपघात झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली तर सर्व यंत्रणांच्या समन्वयामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे समजते.
सदरच्या या कंटेनरमध्ये 2- Methyl- 2-propanol (tert-Butanol) हे अत्यंत ज्वलनशील रसायन हे वाहून नेले जात असताना सदरच्या रसायन केमिकल वाहतूक करणारा हा कंटेनर जागीच अपघात होऊन पलटी झाका त्यामुळे अपघातानंतर परिसरात गंभीर धोका निर्माण झाला आणि रसायन गळती मुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली तर सर्व यंत्रणांच्या समन्वयामुळे रसायन गळतीवर तत्काळ नियंत्रण ठेवण्यास यश प्राप्त केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
सदरच्या घटनेची माहिती मिळताच SVRSS,येरुणकर क्रेन सर्विस, महामार्ग पोलीस केंद्र येथील टीम,हायवे पोलीस, तसेच स्थानिक कोलाड पोलीस प्रशासन आणि सदरील यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.आणि रसायन गळतीवर नियंत्रण केले.तर करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान पलटी झालेल्या कंटेनरच्या मॅनहोलमधून ज्वलनशील रसायनाची गळती होत असल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक अंदाजानुसार काही रसायन बाहेर पडले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मॅनहोलवरील गळती नियंत्रित करण्यात आली.
हे रसायन अत्यंत ज्वलनशील असल्याने अगदी लहानशी ठिणगी किंवा प्रज्वलनाचा स्रोतदेखील मोठ्या आगीचा किंवा स्फोटाचा धोका निर्माण करू शकत होता. त्यामुळे घटनास्थळी अत्यंत काळजीपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीने बचाव व लिकेज कंट्रोल ऑपरेशन राबविण्यात आले.
सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी ‘NO MOBILE ZONE’ लागू करण्यात आला. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खांब ते कोलाड दरम्यानची वाहतूक सुमारे एक तास थांबविण्यात आली. सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत उत्कृष्ट समन्वय, धाडस आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करत हे ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले.
या सर्वांच्या सतर्कतेमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे संभाव्य मोठी दुर्घटना, जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावरील नुकसान टळले. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व पोलीस, महामार्ग प्रशासन, बचाव पथक, टोईंग सेवा आणि संबंधित यंत्रणांचे परिसरातील नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले तसेच महाड येथील रासायनिक कारखान्यातील सुरक्षा आणि रसायन टेक्निकल टीम यांनी घटनास्थळी भेट देत हे रसायन केमिकल सुरक्षित हलविले तर याबाबत अधिक तपास सदरील वाहतूक यंत्रणा आणि स्थानिक कोलाड पोलिसांकडून सुरू असल्याचे कोलाड पोलिसांकडून सांगण्यात आले.