Raigad : मुंबईहून रेल्वेने नेरळ परिसरात येवून मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा गजाआड

Neral Chor

अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :

रायगड जिल्ह्यातील नेरळ परिसरात मोटर सायकल चोरी करणारा सचिन सुनिल सोनावणे,( वय-32 वर्षे, रा.नारायण बिल्डींग, रूम नं.44/2, पाश्ता लेन, कुलाबा, मुंबई) मुबई येथून ताब्यात घेवून पाच मोटर सायकली हस्तगत करण्यात नेरळ पोलिसाना यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिराग रामचंद्र धुळे (राहणार चोरावले, कर्जत) यांची ७जून २०२४रोजी नेरळ रेल्वे स्टेशन पूर्व येथील निर्माण नगरी सोसायटीच्या मोकळया जागेतील पार्किंग ठिकाणाहून हिरा होंडा कंपनीची सी.डी.डिलक्स मॉडेलची मोटार सायकल क्र.एमएच४६/क्यु-१८९० ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली असल्याची तक्रार नेरळ पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

चिराग धुळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेण्यासाठी नेरळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ढवळे यांनी गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार प्रविण लोखंडे यांचेकडे देवून तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, सहा.फौजदार किसवे, पोलिस शिपाई निरंजन दवणे, राजेभाउ केकाण,विनोद वांगणेकर, प्रशांत बेले यांना मार्गदर्शन केले असता संबंधीत पथकाने घटनास्थळी कोणत्याही प्रकारे तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे व गुप्त बातमीदार यांचे मदतीने गुन्हा उघडकीस आणून गुन्हयात आरोपी सचिन सुनिल सोनावणे यास अटक करण्यात आली.
सचिन सोनवणे या आरोपी यांचेकडून नेरळ पोलीस ठाण्याकडे दाखल गुन्हयात चोरलेली मोटार सायकल तसेच इतर पोलीस ठाण्याकडील गुन्हयात चोरलेल्या अशा एकुण पाच मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

सचिन सोनवणे याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.334/2024 भादंविसं कलम 379बुलेट मोटार सायकल क्र.एमएच46/बी.टी.6733,पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.353/2024 भादंविसं कलम 379 एक्टीव्हा स्कुटी क्र. एमएच 46/बी.टी.3476,कामोठे पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.151/2024 भादंविसं कलम 379 सुझुकी एक्सेस स्कुटी क्र. एमएच03/डी.क्यु.1868,नेरूळ पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.346/2024 भादंविसं कलम 379 होंडा कंपनीची सी. बी. शाईन मोटार सायकल क्र.एमएच06/बी.झेड-2245 आदी ठिकाणी दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून गुन्हा उघडकीस आणणेकामी व चोरलेल्या 05 मोटार सायकल हस्तगत करणेकामी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, सहा.फौजदार किसवे, पोलिस हवालदार प्रविण लोखंडे, पोलिस शिपाई निरंजन दवणे, राजेभाउ केकाण, विनोद वांगणेकर, प्रशांत बेले, पोलिस हवालदार अक्षय पाटील, नेम-सायबर क्राईम, रायगड अलिबाग यांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे.
आरोपी सचिन सोनवणे हा सध्या पोलीस कोठडीमध्ये असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *