तालुक्यातील कोप्रोली गावात असलेल्या कमांडर रेनाईसन्स सोसायटीमध्ये 4 घरांमध्ये झालेल्या घरफोडीत जवळपास 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
या ठिकाणी राहत असलेल्या रसिना अलिकोया यांच्या घरात चोरी होवून घरात ठेवलेले विविध प्रकारचे सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे इतर 3 ब्लॉकमध्ये सुद्धा या अज्ञात चोरट्यांनी चोरी करून जवळपास 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.