रायगड जिल्ह्यातील अलिबाग रेवस मार्गावरील थळ ग्राम पंचायत हद्दीतील मौजे सायमन कॉलनी येथे अमिना मनसुरी आणि तिच्या पती हासिम हुसेन मन्सुरी यांना सलिम डिगी याने मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. यातील जखमी महीला ही अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणातील आरोपी सलिम डिगी याला कठोर शासन व्हावे यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संघटिका संजीवनी नाईक यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग पोलिस ठाण्यावर मुक मोर्चाचे आयोजन करीत पोलिस उप विभागीय अधिकारी विनीत चौधरी यांना निवेदन सादर करण्यात आले.
पोलिस उप विभागीय अधिकारी विनीत चौधरी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, अमिना मनसुरी या महिलेला सलिम डीगी नामक गुंडाने अमानुषपणे मारहाण केली असून त्या अमिना मन्सुरी महिलेची प्रकृती चिंताजनक झाली आहे. मागील ६ दिवसांपासून रूग्णालयात पिडीत महिला मृत्यूशी झुंज देत आहे मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ही एक क्रूरता आहे आणि अशी अमानविय क्रूरता करणाऱ्या आरोपीला कठोर शासन होणे गरजेचे आहे. वायशेत येथे सायमन कॉलनी परिसरात घडलेला हा प्रकार अमान्य असून तिचे दहशतीचे वातावरण पसरले आहे सदर मारहाण महिलेस करणारी व्यक्ति ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची असुन त्याने या यापूर्वी असे अनेक प्रकार केल्याचे निदर्शणास आले आहे. त्यामुळे सदर आरोपीला कठोर शासन होणे आवश्यक आहे.
अलिबाग तालुक्यातील थळ ग्राम पंचायत हद्दीतील मौजे सायमन कॉलनी येथे दिनांक 23/12/2024 रोजी दुपारी एकच्या सुमारास मौजे हाशिम मन्सूरी यांचे राहते घरी सायमन कॉलनी, ता.अलिबाग येथे हाशिम मन्सूरी रा.घर नं.304, सायमन कॉलनी, वायशेत, पो.थळ हे त्याचे घरी असताना कोणीतरी घराचा दरवाजा ठोठावल्याने तो उघडला असता सलिम डीगी रा. सायमन कॉलनी, वायशेत, पो, थळ याने त्याचे आईसोबत हाशिम मन्सूरी यांचे घरावरून चालु असलेल्या न्यायलयीन वादावरून तसेच सलिम डीगी याचे विरूध्द फिर्यादी यांचे पत्नीने अलिबाग पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी यांचे डोक्यामध्ये व उजव्या हातावर उपटी मारल्या तसेच हाशिम मन्सूरी उपचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल अलिबाग येथे गेल्यानंतर सलिम डीगी याने हासिम हुसेन मन्सुरी यांची पत्नी अमीना हिच्या सुध्दा उजव्या पायावर, डावे हातावर व डोक्यावर लोखंडी रॉडने उपटी मारून दुखापत केली.
तसेच दिनांक 24/12/2024 रोजी 12:14 वा च्या सुमारास मौजे वायशेत येथे मनुसरी यांचे घरी, त्यांची आई व वडील यांना सिव्हील हॉस्पीटल अलिबाग येथुन भेटुन त्यांना जेवणाकरीता डब्बा आणणे करीता घरी गेले असता सुमारे 12.14 वा.चे सुमारास आरोपी सलिम डिगी ( रा.वायशेत पो.नवगाव )याने फिर्यादी यांचे घराला लावलेले कुलुप तोडुन घरामध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करुन घरातील सामान कोणालाही न विचारता घराबाहेर काढले व टेम्पोमध्ये भरत होता. त्यावेळी घरातील बेडरुम मध्ये ठेवलेले लोखंडी कपाट उघडुन त्यामधील 1,00,000/- रुपये चोरी केले व घरातील सामन बाहेर काढुन चोरी करुन घेवुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना मिळून आला होता.