भारतीय सैनिक समीर सदानंद साळुंखे यांनी १७ वर्ष भारतीय सैन्य दलात उत्कृष कामगिरी बजावत तसेच देशाची निर्भिटपने सेवा करत सैन्यदलातून निवृत्त झाले असून ते २ जानेवारी रोजी स्वगृही कोलाड आंबेवाडी पुई येथे परतल्याने कोलाड आंबेवाडी नाक्यावर त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करत मिरवणूक काढून भारतमातेकी जय म्हणत औक्षण करत पुष्पवृष्टी केली.
पुई येथील समीर सदानंद साळुंखे यांचा भारतीय सैन्य दलातील आपल्या देश सेवेचा सैन्य दलातील संपूर्ण सेवेचा कार्यकाळ पूर्ण करून स्वगृही परतत असताना त्याचे औचित्य साधून तेथील ग्रामस्थांनी २ जानेवारी रोजी कोलाड आंबेवाडी येथे एकच जल्लोष करत भव्य स्वागत करत आंबेवाडी गावचे आराध्य ग्रामदेवता श्री अंबर सावत यांचे चरणी लीन होऊन प्रथम दर्शन घेतले मंदिरात पुरोहित महेशस्वामी जंगम यांनी श्रींच्या मूर्तीला समीर त्यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पमाळा आरती असे धार्मिक विधीवत कार्यक्रम संपन्न केले तसेच वीर भाई हुतात्मा कोतवाल यांच्या शौर्य दिनाचे औचित्य साधून त्यांच्या तस्वीरेला आंबेवाडी ग्रामपंचायत मध्ये पुष्प मालिका अर्पण करून माजी सैनिक समीर साळुंखे यांचे औक्षण करून या लढावू शूर बहादुराची मिरवणुक काढून उपस्थित नागरिकांनी त्याचे कुटुंबीय समावेत सन्मान केला.
नाभिक समाजात जन्माला आलेल्या समीर साळुंखे याचा अत्यंत खडतर प्रवास त्यांच्या आई-वडिलांचा प्रवास तसा काटेरीच त्यांचे वडीलांचे मुळगाव धानकान्हे वडिलोपार्जित सामाजिक व्यवसायाने केश कर्तनकार असल्याने पुई कोलाड आंबेवाडी येथे व्यवसायानिमित्त तेथे स्थीर झाले त्यांचे पुत्र समीर हे आपला व्यवसाय आणि मेहनत व सत्यत्वेवर त्याने आपल्या मुलांवर अत्यंत गरीब परीस्थीतीत चांगले संस्कार करून देशसेवेसाठी सुपूर्द करण्याचे स्वप्न पाहिले होते त्यात समीर साळुंखे यानी कधीही शैक्षणिक व इतर क्षेत्रात माघारपाळी न घेता वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत जिद्द चिकाटी घेऊन देश सेवेसाठी सैन्यात रुजू झाले गेले १७ वर्ष जम्मू काश्मीर लडाख अशा अनेक ठीक ठिकाणी देशाची सेवा निष्ठेने केली तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याच उत्तम फळ त्यांची १७ वर्षाची सेवा पूर्ण होऊन आपल्या परिवारात आले त्याचा आनंद अगणित होता.या भावनेतून कोलाड आंबेवाडी पुई धानकान्हे येथील ग्रामस्थ तसेच मित्र परिवार उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देत सन्मान केला.
या कार्यक्रमास उपस्थित त्याचे समाज बांधव तेथील नागरिक त्याचबरोबर पंचक्रोशीतील अनेक सर्व वर्गातील ग्रामस्थांना ही आनंद होता या अनुषंगाने सर्वांनी त्यांची आंबेवाडी कोलाड ते पुई असे दोन ते तीन किलोमीटर अंतराची मिरवणूक काढलेली दिसत होती त्या मिरवणुकीचा शेवट हा त्यांचे पुई येथील राहत्या निवासस्थानी छोट्या सभेतून तसेच उपस्थित मान्यवर यांच्या मनोगतातून आणि त्याच्या कामाच्या कर्तबगारीतून करण्यात आले सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बरोबरच अनेक मान्यवरांचे छोटे खाणी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे यांनी व यशवंत खराडे यांनी केले. त्यानंतर कोलाड पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक कदम, दळवी नाभिक समाजाचे महाड रोहा येथील तालुका अध्यक्ष नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष सह उपस्थित गायकवाड सर पुई गावचे सरपंच मांडलुस्कर, महेशस्वामी जंगम,भरत भोसले ,संतोष गायकवाड, बापू सोनगिरे, यांनी केले.
तर सदरच्या या कार्यक्रमास पंचक्रोशीतील अनेक समाजसेवक सकाळ हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक गोवे गावचे अण्णा पवार, भरत सातआंबेकर, श्री संजय लोटणकर ,चंद्रकांत लोखंडे,तसेच अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच समीर यांचा मित्रपरिवार, महिला वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता.