राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या चालकाने अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावात एका महिलेच्या घरात शिरून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
घटनेचा सविस्तर तपशील: दिनांक १० मे २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला (वय ३६ वर्षे) घरात एकटी असताना तिची मोठी मुलगी कामावर गेलेली होती व लहान मुलगी शेजाऱ्यांकडे खेळण्यासाठी गेली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी प्र** भ** या चालकाने घरात प्रवेश केला.
त्या वेळी पीडित महिला भांडी घासत असताना आरोपीने मागून येऊन तिच्या कमरेला मिठी मारून विनयभंग केला. तिने विरोध केला असता आरोपीने तिच्या कानशिलात मारून तेथून पळ काढला.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात रात्री ११:३२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मराठे तपास करत आहेत.
स्थानिक संतप्त: या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या जवळच्या व्यक्तीकडून असा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न अधिक गहिरा झाला आहे. संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.