तांबडी अत्याचार व हत्या प्रकरणी लागलेला निकाल हा अत्यंत अन्यायकारक आणि दुर्दैवी : ना.अदिती तटकरे

Aditi tatkare

अन्यायकारक निकालाविरोधात अदिती तटकरे यांची पत्रकार परिषद; उच्च न्यायालयात जाणार

कोलाड (श्याम लोखंडे) :
तांबडी अत्याचार व हत्या प्रकरणी सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा अत्यंत त्या पीडितेच्या कुटुंबियांवर अन्यायकारक आणि दुर्दैवी आणि वेदनादाई आहे.पीडित कुटुंबार झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रयत्न सुरू करण्यात येतील तसेच उच्च न्यायालयात जाऊन या प्रकरणाची दाद मागून त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री ना.अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सबंध राज्याला हादरवून सोडलेली, सरकारतर्फे चालवण्यात आलेल्या फास्ट ट्रकवरील पीडीत अत्याचार व खून रोहा तालुक्यातील तांबडी प्रकरणातील सर्वच आरोपींची माणगांव सत्र न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली. सर्व आरोपींची निर्दोष सुटका होणे, हा न्यायालयीन निकाल फारच मोठा धक्का पीडितेच्या कुटुंबियांवर तसेच साऱ्या रोहेकराना धक्काच बसला आरोपींची निर्दोष सुटका होण्याचा निकाल दुर्दैवी आहे. तपास यंत्रणेनी वेळोवेळी मदत करण्यात येत असताना त्याचा पाठपुरावा देखील नामख्यात सरकारी वकील ॲड उज्वल निकम करत असताना असा सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा अमान्य असल्याचे म्हणत रविवारी ११ में रोजी सकाळी सुतारवाडी गीताबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
रोहा तालुक्यातील तांबडी परिसरात अत्यंत निंदनीय आणि निषेधार्थ अशी घटना घडली होती. आणि ती घटना घडल्या नंतर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक असतील त्यांच्या नियंत्रणाखाली त्या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र वरीष्ठ अधिकाऱ्यांची टीम नेमली होती. बलात्कार प्रकरण आणि हत्या प्रकरणी जे काही गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यात आले होते आणि त्या नंतर ही संबंधित केस कुटुंबाच्या वतीने फास्ट ट्रॅक मध्ये कोर्टात चालावी यासाठी सरकारी वकील म्हणून ॲड उज्वल निकम यांना सरकारच्या वतीने व पीडित कुटुंबाच्या वतीने नेमण्यात आले होते.
दोन वर्ष माणगाव येथील सत्र न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू होती त्यामध्ये काही इव्हेंड असलेले डी एन ये रिपोर्ट असतील इतर काही व्हिटनेड असतील बाकी काही केस प्रकरणातील त्रुटी ताकिंवा लढविण्याच्या दृष्टीने तसेच त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जी काही सर्व सखोल चौकशी किंवा पोलिस विभाग अथवा इतर विभागाच्या माध्यमातून काही गोष्टी करावयाच्या असतात अथवा सरकारी वकिलांच्या माध्यमातून असतात त्या सर्व करण्यात आल्या पण काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडून काही निकाल देण्यात आला तो अत्यंत अन्यायकारक आहे दुर्दैवी आहे तसेच त्याचे दुःख आणि वेदना होत असल्याचे भावनिक होत सांगितले.
 ज्या वेळेला कोर्टाची तारीख असेल त्यावेळेल्या सरकारी वकील तसेच संधीत अधिकारी त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी उपस्थित राहिले तसेच त्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून कुटुंबासोबत आहोत तसेच ॲड उज्वल निकम हे देखील सोबत आहोत निकालाची जेजमेंट कॉपी कुटुंबाला ही दुसऱ्या दिवशी मिळाली त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आणि या प्रकरणाची दाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार असून पीडितेला न्याय मिळावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील पत्र व्यवहार करण्यात आला तसेच भेट देखील घेण्यात येणार आहे असल्याचे सांगितले तसेच वरीष्ठ उच्च न्यायालयात अपील करून पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शेवटी सांगितले.
तसेच प्रसंगी यावेळी पीडित कुटुंबाचे नातेवाईक आणि समाज बांधव या पीडितेला न्याय मिळावा यासाठी या परिषदेत उपस्थित होते तर सदरच्या पत्रकार परिषेदेतूनच याबाबत तसेच उच्च न्यायालयात याबाबत अपील लवकरात लवकर करून न्याय प्रविष्ट सुरू करावी यासाठी पीडित कुटुंबाचे नातेवाईक समावेत सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांना दूरध्वनी करून संपर्क साधून याचिका दाखल करण्यात यावी असा आग्रह कुटुंबाच्या वतीने करण्यात आला तर यावर ॲड उज्वल निकम यांनी सांगितले की मी लवकरात लवकर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे असा विश्वास व्यक्त केला.
मात्र या निषेधार्थ मंगळवारी रोह्यात मोर्चा काढण्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे तर पीडीतेच्या न्यायासाठी मोर्चा व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एकंदर प्रकरणाला काय कलाटणी मिळते, नेमके काय घडते, संबंध रोहेकरांची काय आक्रमकता राहते ? याकडे सबंधं जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *