शासकीय आश्रमशाळा पाथरज येथे ‘सेवा संकल्प अभियान’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात

कर्जत-ग्रामीण | मोतीराम पादीर
  शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पाथरज  कर्जत येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत’सेवा संकल्प अभियान’ या अंतर्गत शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे औचित्य साधून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पाथरज  कर्जत येथे शालेय स्तरावर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. दिनांक २२/९/२०२६ ते २९/९/२०२६ पर्यंत शालेय स्तरावर इयत्ता निहाय चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,वृक्षारोपण,निबंध स्पर्धा,सर्पदंश जनजागृती, रांगोळी स्पर्धा,आरोग्य शिबिर, महापुरुष यशोगाथा व व्यक्तीमत्त्व विकास इत्यादी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप सराई,ग्रामपंचायत समितीचे सदस्य,पोलीस पाटील,  शाळेचे मुख्याध्यापक  अजित लालासाहेब बनसोडे तसेच सर्व शिक्षक वृंद,अधीक्षक -अधिक्षिका, वर्ग चार कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘सेवा संकल्प अभियान’ या उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांनी आपले कला- कौशल्य सादर करून दाखवले आहे.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते योग्य बक्षीस देऊन त्यांच्या कलागुणांचा गुणगौरव करण्यात आला.  सदरहू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.