वन खात्यानंतर पुरातत्व विभागाची किल्ले रायगडावरील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा

Raigad

महाड (मिलिंद माने) :

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावर झालेल्या अनधिकृत अतिक्रमण कारवाईनंतर झालेल्या वादामुळे राज्यातील सर्वच गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावरील २४ निवासी घरे व ५६ दुकाने अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम केंद्रीय पुरातत्त्व विभाग राबविणार असून . वन खात्याच्या नोटिशीनंतर आता पुरातत्त्व विभागाने देखील या रहिवाशांना नोटिसा दिल्या जाणार असून ७ दिवसात किल्ल्यावरील रहिवाशांना घरे रिकामी . करा अन्यथा ती अतिक्रमण मुक्त केली जातील असे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणामुळे ऐतिहासिक किल्ल्याचे स्वरूप बदलत चालल्याने त्या ठिकाणी विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम मागील वर्षी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने राज्य सरकारच्या महसूल विभागाने राबवली होती मात्र या अतिक्रमण मुक्त विशाळगड करण्याच्या भूमिकेवरून त्या ठिकाणी मोठा वादंग निर्माण झाला होता या वादाला जातीयतेचे स्वरूप दिल्याने मोठ्या प्रमाणावर राज्यात आंदोलने झाली होती यानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाने राज्यातील सर्वच ऐतिहासिक गड किल्ल्यांवरील अतिक्रमण मुक्त करण्याचे धोरण राबवण्याचे ठरवले होते या धोरणानुसारच छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर असणारी पुरातन व त्यानंतर झालेली काही अनधिकृत घरे तसेच किल्ले रायगडावरील पाऊलवाटे जगदीश्वरा मंदिरापर्यंत असणारे छोटे दुकाने व स्टॉल हे देखील अतिक्रमण मुक्त करण्याचे धोरण पुरातत्त्व विभागाने राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार प्रथम वन खात्याने नोटीसा दिल्यानंतर आता पुरातत्व विभागाने देखील रहिवाशांना नोटीस देण्याचे ठरवले आहे

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड वर २४ निवासी घरे व ५६ छोट्या मोठ्या स्वरूपातील दुकाने व स्टॉल कार्यरत आहेत

रायगड किल्ला अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम केंद्रीय पुरातत्व विभाग राबविणार आहे. केंद्रीय पुरातत्व विभाग किल्ले रायगड वरील धनगर समाजाची निवासी घरे व त्यातील काही कुटुंबांनी किल्ल्यावरील महादरवाजापासून, होळीच्या माळावरील बाजारपेठ ते हत्ती तलाव व जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शीतपेयाचे व पाण्याच्या बाटल्यांचे स्टॉल तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल झुणका भाकर केंद्र चहा व पॅक बंद खाद्यपदार्थांचे स्टॉल उपजीविकेसाठी उभारले आहे ते स्टॉल देखील अनधिकृत असल्याचे भारतीय पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे त्यामुळे निवासी संकुलाबरोबरच हे अनधिकृत देखील काढून टाकण्याची मोहीम . भारतीय पुरातत्व विभाग राबविणार आहे.

प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे व अवशेष कायदा१९५८. च्या कलम १९ आणिAMASR. नियम१९५९. च्या नियम३८(१) अन्वये अनधिकृत बांधकाम/ बेकायदेशीर बांधकाम काढून टाकण्याचे धोरण आहे.

प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे व अवशेष कायदा, १९५८ च्या कलम१९(१) नुसार, कोणत्याही व्यक्ती संरक्षणाखाली असलेल्या प्राचीन स्मारकामध्ये कोणतेही खाणकाम, बांधकाम, पुनर्बांधणी ,भर घ** ,दुरुस्ती, नुतनीकरण, किंवा अन्य स्वरूपाचे कोणतेही कार्य परवानगीशिवाय करता येत नाही, या कायद्याअंतर्गत सशक्त अधिकाराचा वापर करत केंद्रीय सरकारने भारत सरकार अधिसूचना क्रमांक.७७६ दिनांक१६.६.१९९२ अन्वये रायगड किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे त्यामुळे कोणतेही बांधकाम, दुरुस्ती ,नूतनीकरण, पुनर्बांधणी इत्यादी कामे या कायद्याच्या व नियमाच्या विरोधात आहेत
या कायद्यानुसार रायगड किल्ल्यावरील घरे असणारे रहिवाशी यांनी रायगड किल्ल्याच्या संरक्षित क्षेत्रात अनधिकृत रित्या बांधकाम/ दुरुस्ती केली आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे त्यामुळे सात दिवसाच्या आत नोटिसा मिळाल्यापासून सदरची घरे घालवण्याच्या सूचना या नोटिशीमुळे प्राप्त होत आहेत.

जर तुम्ही हे बेकायदेशीर बांधकाम वेळेत काढून टाकले नाही ,तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास तुम्हालाAMASR. नियम१९५९. च्या नियम३९. नुसार शिक्षा होऊ शकते असे या नोटीशीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे या नोटिसा किल्ल्यावरील रहिवाशांना व दुकानदारांना भारतीय पुरातत्व विभाग बजावणार आहे तसेच या नोटिशांच्या प्रति माहितीसाठी रायगड जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सहाय्यक वनरक्षक रोहा पोलीस निरीक्षक महाड तहसीलदार महाड यांना देण्यात आले आहेत या नोटीसा संकलन सहाय्यक भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण रायगड उपवृत्त कार्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे रा.पी.दिवेकर यांच्या सहीने बजावण्यात आल्या आहेत

रायगड किल्ल्यावरील धनगर समाजाची २४ निवासी घरे आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे:१) महादेव नथू अवकीरकर, २) बाबू नथू अवकीरकर
३) रायबा भागोजी अवकीरकर
४) श्रीमती सुलोचना गंगाराम महाबले
५) विठ्ठल रहु अवकीरकर
६) रवी भागोजी अवकीरकर
७) श्रीमती जाईबाई देवबा झोरे
८) श्रीमती सखुबाई धोंडीराम शिंदे
९) श्रीमती लीलाबाई धाकटू अवकीरकर
१०) सुनील शिंदे
११) चंद्रकांत धाऊ गोरे
१२) गंगाराम नारायण उगीरकर
१३) संजय विठ्ठल अवकीरकर
ही १३निवासी घरे रायगड किल्ल्यावरील असणाऱ्या ऐतिहासिक बाजारपेठे जवळ आहेत

किल्ले रायगडावरील जगदीश्वरा मंदिराजवळ असणारी ८ घरांची नावे पुढीलप्रमाणे;
१) किशन नवलू अवकीरकर
२) वसंत श्यामा अवकीरकर
३) रामचंद्र अवकीरकर
४) विठ्ठल बाबू अवकीरकर
५) संतोष मारुती शिंदे
६) वसंत धाऊ अवकीरकर
७) मोतीराम धाऊ अवकीरकर
८) बापू भागोजी अवकीरकर
किल्ले रायगडावरील मज्जिद मोर्चा जवळ २ घरे आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे;
१) बाबू भागोजी अवकीरकर
२) सुरेश भागोजी अवकीरकर
किल्ले रायगडावर जाणाऱ्या वासुरेखिंडीच्या जवळ असणारे एकमेव घर;
१) सुरेश बामू अवकीरकर

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील. (होळीच्या माळ) बाजारपेठ ते समाधी स्थळापर्यंत १६ स्टॉल आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे;
१) वसंत धाऊ अवकीरकर
२) किशन नवलू अवकीरकर
३) बापू भागोजी अवकीरकर
४) वसंत क्षमा अवकीरकर
५) विठ्ठल रहु अवकीरकर
६) संतोष मारुती अवकीरकर
७) संगीता रवी अवकीरकर
८) मंगल संदीप ढवळे
९) चंद्रकांत धाऊ गोरे
१०) रायबा भागोजी अवकीरकर व संतोष ढेबे
११) काशीराम नथू अवकीरकर
१२) वैशाली महेश बावधने
१३) पिंकी गंगाराम अवकीरकर
१४) महादेव नथू अवकीरकर
१५) सखुबाई धोंडीराम शिंदे
१६) सुलोचना गंगाराम महाबले

किल्ले रायगडावरील हत्ती तलाव ते महादरवाजापर्यंत ७ स्टॉल धारकांची नावे पुढीलप्रमाणे;
१) सिताराम रामचंद्र अवकीरकर
२) हरिश्चंद्र शिंदे
३) राजेश रामचंद्र अवकीरकर
४) संजय विठ्ठल अवकीरकर
५) नीलम विठ्ठल अवकीरकर
६) भागोजी कोकरे
७) शांताराम हिरवे

किल्ले रायगडावरील महादरवाजा ते चित्त दरवाजापर्यंत ३१ स्टॉलधारक आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे;
१) दिलीप कोंडीराम आखाडे
२) कोंडीराम आखाडे
३) सखुबाई कोकरे
४) संगीता शांताराम हिरवे
५) यशवंत दगडू आखाडे
६) संदीप शिंदे
७) रमेश बाबू ढवळे(राहुल ढवळे)
८) चंद्रकांत कोकरे
९) अक्षय कोकरे
१०). गणेश झोरे
११) सिताराम झोरे
१२) सुरेश भागोजी अवकीरकर (मनीषा अवकीरकर)
१३) भाऊ भागोजी अवकीरकर (सुशीला अवकीरकर)
१४) निलेश खातू
१५) नीलम ढेबे
१६) सुरेश बांबू अवकीरकर
१७) राजू होगाडे (भारती होगाडे)
१८) रुपेश झोरे
१९) राजू शिंदे
२०) पप्पू भाऊ ढवळे (भाविका ढवळे)
२१) सुमन मारुती जाधव
२२) गणेश बळीराम अवकीरकर
२३) सुनिता कल्पेश जाधव
२४) श्रीमती पार्वती ढवळे
२५) श्रीमती कलावती जाधव (सयाजी जाधव)
२६) रंजना ढवळे /अनिता अवकीरकर
२७) दीपक कोकरे
२८) सुनील जाधव
२९) सुरेश जाधव
३०) संतोष जाधव
३१) सीमा संदीप जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *