रोह्यात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

रोह्यात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
कोलाड | श्याम लोखंडे 
रायगड रोहा तालुक्यात राजकीय भूकंप रोहे नगरीचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अमित उकडे, मयुर पायगुडे, सागर भोभड यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मंगळवारी १ सप्टेंबर रोजी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करत राष्ट्रवादी अजित पवार गटाला तसेच रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांना मोठा धक्का देत रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी रोहा अलिबाग मुरूड चे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी उपस्थित होते.तर सदरच्या या नेतेमंडळीच्या पक्ष प्रवेशाने रोहा तालुक्यात आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे तर माजी नगरसेवक असलेले संतोष पोटफोडे यांचे तटकरे कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याने त्यांच्या पक्षबदलाला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले असल्याने नक्की रोहा बदलतोय काय यावर आता सर्वत्र राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
—————————————
आम्ही जुने पदाधिकारी आहोत. मात्र, पक्षात काम करूनही आम्हाला सातत्याने डावलले जात होते. स्थानिक नेतृत्व असूनही विविध कार्यक्रमांमध्ये आम्हाला योग्य स्थान दिले जात नव्हते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला.
…संतोष पोटफोडे, माजी नगराध्यक्ष, रोहा
—————————————
सध्या रोहे शहर आणि तालुक्यात कोणी जुन्या कार्यकर्त्यांना जुमानत नाही. तसेच पक्षाच्या कार्यक्रमात सातत्याने डावलेणे जे स्थान पूर्वी होते ते दिले जात नसल्याने योग्य तो निर्णय माजी रोहे नगरीचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे साहेब यांनी घेतला असून आम्ही देखील नवनिर्वाचित रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कर्तृत्ववावर विश्वास ठेवत हा पक्षप्रवेश केला आहे.
…. अमित उकडे रोहा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट.
—————————————
स्थानिक पातळीवर उत्तम काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान आणि स्थान देण्याची भूमिका शिवसेनेत प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान मिळेल . तर प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत आहे. तर रोहासह रायगड बदलणार आहे .
…भरत गोगावले, पालकमंत्री, रायगड