रोह्यातील कार्यक्रमात गोगावल्यांचे नाव वगळल्याने पुन्हा रायगडात शह-काटशहाचे राजकारण?

Roha palika nimantran patrika
महाड (मिलिंद माने) :
रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३२ रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील दत्तात्रय तटकरे यांची कन्या मुंबईला बाल विकास मंत्री अदिती सुनील तटकरे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यातून पालकमंत्री पदावरून जिल्ह्यात दररोज कुठे नाव कुठे कुरघोडीचे राजकारण होत असताना आज पुन्हा एकदा रोह्यातील कार्यक्रमावरून जिल्ह्यातीलच मंत्री गोगावल्यांचे नाव वगळल्याने पुन्हा रायगडात राजकारण तापण्यास सुरुवात होणार असल्याचे चित्र पाहण्यास मिळत असून आजच्या अजित पवारांच्या उपस्थितीत तटकरे कोणावर तोफ डागणार याबाबत रायगडात कमालीची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून तटकरे विरोधात शिंदे सेना असा संघर्ष रायगड करांना पुन्हा वर्षभरापासून अनुभवण्यास मिळत आहे. रायगडातील शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी, भरत गोगावले ,महेंद्र थोरवे यांनी तटकरे कुटुंबावर मोठ्या प्रमाणावर जहरी टीका केली आहे. आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला शिंदे गटाने विरोध केल्याने रायगडचे पालकमंत्रीपद वर्षभरापासून प्रलंबित आहे. या पालकमंत्री पदावरून रायगडात दररोज कुठे ना कुठे तटकरे कुटुंबांवर आरोप प्रत्यारोप झाल्याचे पाहण्यास मिळते.
रायगड जिल्ह्यातील रोहा येथे डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या सभागृहाचे (नाट्यगृह) लोकार्पण सोहळा राज्याचे वित्त मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते होत आहे. या कार्यक्रम पत्रिकेत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार व अर्धा रोहा तालुका ज्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. त्या मतदारसंघातील आमदार व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह राज्यसभेचे खासदार धैर्यशील मोहन पाटील व कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून गेलेले माजी आमदार अनिकेत सुनील तटकरे परंतु (निमंत्रण पत्रिकेत विद्यमान आमदार दाखविलेले) यांचा निमंत्रण पत्रिकेत आवर्जून उल्लेख असताना रोहा तालुक्याचा काही भाग अलिबाग विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. त्या महिंद्र दळवींचे नाव व मंत्री म्हणून भरत गोगावले यांचे नाव तसेच कोकण शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले म्हात्रे व कोकण पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले भाजपाचे निरंजन डावखरे यांचे नाव मात्र जाणीवपूर्वक वगळले आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात छापण्यात आलेली निमंत्रण पत्रिकेमध्ये केव्हा तटकरेंचा आज बोलबाला असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या रोह्यातील डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ३२ रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे कुणावर तोफ डागणार यानंतरच रायगडातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होणार असल्याचे पाहण्यास मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *