‘माथेरानची राणी’ मिनीट्रेनचा शतकी प्रवास उलगडणारा रेल महोत्सव : हेरिटेज लूकमध्ये ऐतिहासिक ट्रेनचे आगमन

Matheran train
कर्जत | गणेश पवार 
माथेरानची राणी अशी बिरुदावली असलेली माथेरानची मिनिट्रेन बाबत इतिहासापासून आतापर्यंत झालेल्या बदलांची माहिती.जुन्या वस्तीचे प्रदर्शन,वाफेवर चालणारे इंजिन,माथेरानचा शोध लागल्यापासून आतापर्यंत मिनीट्रेनने टाकलेली कात,याचे प्रदर्शनद्वारे मध्य रेल्वेकडून रेल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात येथे आलेल्या पर्यटकाना याचा मोफत आनंद घेता येणार आहे. हे रेल महोत्सव दोन दिवस खुले असणार आहे.

माथेरानची राणी नोव्हेंबरमध्ये येणार रुळावर

 माथेरानचा शोध ठाणे कलेक्टर ह्युज मॅलेट यांनी लावल्या पासून 1900 सालापर्यंत माथेरान वसविल्यानंतर मुख्य समस्या होती ती दळणवळणाची.सर आदमजी पिरभाय व त्यांचा मुलगा अब्दुलहुसेन पिरभाय यांनी 1901 ते 1907 या कालावधीत मिनीट्रेनचे काम सुरू केले होते.दरम्यान 28 जुलै 1904 रोजी त्यांना अंतिम मंजुरी मिळाली व कामाला गती येऊन मिनिट्रेन सुरू झाली.तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या रुपात मिनीट्रेनने कात टाकली. याचा संपूर्ण इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा या हेतूने मध्य रेल्वे कडून रेल महोत्सवाचे आयोजन दि.13 रोजी माथेरान स्थानकात केले होते.

माथेरान राणी चार महिने घेणार विश्रांती, शटल सेवा नियमित

या कार्यक्रमाला  दुपारी 12 वाजता येथील प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता सागर सर यांच्या हस्ते फित कापून महोत्सवाला सुरुवात झाली. सुरुवातीला 1850 पासून 1900 पर्यंत माथेरान विषयी माहिती, 1900 ते 1907 रेल्वे साठी समोर आलेली आव्हाने त्यांना पार करून ही मिनिट्रेन कशी सुरू झाली याचा इतिहास, 1907 पासून 1938 पर्यंत वाफेवर चालणारे इंजिन अस्तित्वात,1938 ते 1983 पर्यंत मिनीट्रेन मध्ये झालेले आमूलाग्र बदल,त्यानंतर आजपर्यंत सुरू असलेली ट्रेन याची इत्यंभूत माहिती ध्वनिचित्रफितीद्वारे सांगितली जात होती. बदलते रेल्वे स्थानक यांचे सुरुवातीपासून आतापर्यंत डिझाइन,वाफेवर चालणारे इंजिन,रेल्वे मोटार पासून डिझेल इंजिन पर्यंत फोटो आणि माहिती फ्रेम, तसेच त्या काळातील विविध वस्तूंचे संग्रहालय या बाबत माहिती देण्यात आली. त्याकाळातील वाफेचे इंजिन अजूनही नेरळ-माथेरान मार्गावर धावते. त्या चालत्या इंजिनाची माहिती सांगण्यात आली. दरम्यान हारफुलांनी सजवलेली हेरिटेज रुपात असलेली मिनीट्रेनचे आगमन झाले.जुन्या पद्धतीमध्ये रंगरंगोटी केलेले बोगी आणि इंजिन पाहण्यासाठी पर्यटकासह लोकांनी एकच गर्दी केली होती. या ट्रेन मधील आसनव्यवस्था पूर्ण पर्यटकानी भरगच्च भरली होती.

Matheran train

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील डी. नीला यांनी मान्यवरांना या हेरिटेज मिनीट्रेनचे महत्व पटवून सांगितले सुटसुटीत असलेली आसन व्यवस्था,खेळती हवा राहण्यासाठी मोठ्या खिडक्या यामुळे जुनी मिनीट्रेनचा लूक दिसत होता. आपल्या भाषणात बोलताना सागर सर म्हणाले की, या मिनीट्रेनला आम्ही पुन्हा जुन्या पद्धतीने आपणासमोर आणली आहे हा हेरिटेज लूक लोकांना नक्कीच आवडेल.ही मिनिट्रेन माथेरानला जोडणारी मध्य रेल्वेची प्रमुख मार्गिका आहे. नक्कीच या रेल्वेने प्रवास करताना पर्यटकाना मनसोक्त आनंद मिळणार आहे. हा महोत्सव शनिवार दि.13 आणि रविवार दि.14 असा दोन दिवसांचा असेल.या महोत्सवासाठी पिरभाय परिवाराकडून अलीअकबर पिरभाय हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *