महाएल्गार पूर्वीच सुधाकर घारे यांना अटक

चौक | अर्जुन कदम
खालापूर तालुक्यातील गोदरेज व टाटा स्टील कंपनीवर स्थानिक बेरोजगार तरुणांना न्याय देण्यासाठी उद्या सर्वपक्षीय महा यल्गार मोर्चा पुकाराला होता,त्याअगोदरच राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष व महाएल्गार प्रमुख सुधाकर घारे यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. 
आज खालापूर पोलीस स्टेशनं मध्ये सुधाकर घारे यांच्या सोबत बोलणी करण्यास सर्व पक्षीय शिष्ट मंडळ बोलावल्यावर सुधाकर घारे जिल्हाध्यक्ष, संतोष बैलमारे जि प सदस्य, सुरेश पाटील, काँग्रेस चे सागर जाधव,  युवा जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, शेकाप चे कैलास गायकवाड, रवी रोकडे, ह्याच्या सह अनेक नेते यांना अटक करून पोलीस पिंजऱ्यामध्ये अज्ञात स्थळी नेण्यात आले.
त्या नंतर सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी पोलीस गाड्या अडवून बाहेर पडण्याचा रस्ता बंद केला. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना सौम्य पणे पोलीस स्टेशन च्या बाहेर काढले.
काही काळ कार्यकर्त्यानी मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला जाणाऱ्या जोड रस्ता अडवीला. कार्यकर्ते संतापले, नेते अटक झाल्याने उद्या च्या मोरच्यावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.