पोलादपूरमध्ये ‘फक्त महिलांसाठी’ नृत्यस्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ ते ७८ वयाच्या महिलांचा जल्लोष

पोलादपूरमध्ये 'फक्त महिलांसाठी' नृत्यस्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ ते ७८ वयाच्या महिलांचा जल्लोष
पोलादपूर : 
शहरातील दिशा सांस्कृतिक ग्रुपच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी फक्त महिलांसाठी नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता महिलांच्या भरगच्च उपस्थितीत महिला स्पर्धकांनी केलेल्या सादरीकरणावेळी महिलांनीच टाळया, शिटया व चित्कारांनी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह अक्षरश: डोक्यावर घेतले. 8वर्षांच्या मुलीपासून 78 वर्षांच्या आज्जीबाईंनीदेखील यावेळी नृत्याचे सादरीकरण केले. फक्त फक्त महिलांसाठी स्पर्धेत ज्योती दाभेकर-विनिता पार्टे विजेत्या ठरल्या तर जोगेश्वरी गाडीतळच्या आदिवासी तरूणींचे समूहनृत्य हजारो रूपयांची रोख बक्षिसे मिळवित खास आकर्षण ठरले.
पोलादपूर शहरातील दिशा सांस्कृतिक ग्रुपच्या अध्यक्ष संगिता संतोष मोरे यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या फक्त महिलांसाठीच्या नृत्यस्पर्धेवेळी नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, भावी नगराध्यक्षा स्नेहा मेहता, परिक्षिका वैशाली मिंडे आणि बिशा पोशिलकर आदी उपस्थित होत्या.
यावेळी अपर्णा भागवत आणि अध्यक्षा संगिता मोरे यांनी मान्यवर महिलांचा स्वागतसत्कार केला. यावेळी नगरसेविका श्रावणी शहा, अंकिता जांभळेकर, माजी नगराध्यक्षा अश्विनी गांधी, साहित्यिका अरूणा भागवत, माजी प्रभारी पंचायत समिती उपसभापती कांचन बुटाला तसेच अनेक मान्यवर महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांना दरवर्षी प्रसिध्दीसहकार्यासाठी सन्मानित करण्यात आले. यावेळी  नगराध्यक्षा शिल्पा दरेकर यांनी सर्व स्पर्धक तसेच आयोजक दिशा सांस्कृतिक ग्रुपला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वैदेही भिंगारे-आरोही सुतार, अंकिता निकम-खुशी निकम, निता पार्टे-वर्षा जामगे, ज्योती दाभेकर-विनीती दाभेकर, उज्ज्वला तथा माई शेठ-वैशाली जोशी, सनम शेठ-नव्या शेठ, ज्योती मुकणे-नेहा पवार, समृध्दी तांबे-यादवी सुतार, प्रतिक्षा शहा-आरोही शहा, प्राची सुतार-आरोही सुतार, जोगेश्वरी गाडीतळ आदिवासी ग्रुप, आयांशी जाधव-जान्हवी जाधव, रूचिता दुदूस्कर-समिक्षा दुदुस्कर, प्राजक्ता साळवी-कार्तिकी साळवी, श्रावणी सुकाळे-अक्षया सुकाळे, रूचिता मेस्त्री-काजल चिकणे, तृप्ती सुकाळे-श्रेया सुकाळे, मनिषा जाधव-सोनू पवार आदी महिलांनी आपआपल्या नृत्याविष्कारांनी महिला प्रेक्षकांची मने जिंकल्याने प्रेक्षक महिलांनी संपूर्ण सभागृह डोक्यावर घेतले. परिक्षिका वैशाली मिंडे यांनीही शास्त्रीय नृत्यप्रकार सादर करून प्रेक्षकांच्या टाळया मिळविल्या. सुवर्णा सुकाळे यांनीही विडंबनकाव्य सादर केले.
परिक्षिकांचा निकाल तयार होईपर्यंत स्टेजवर सर्व महिलांना नृत्यसादरीकरणासाठी निवेदिका योगिता भागवत यांनी आवाहन केल्यानंतर तब्बल 40-50 आबालवृध्द महिलांनी वेगवेगळया रिमिक्स गाण्यावर ताल धरला. शेवटी महाराष्ट्राची लोकधारा सादर करणाऱ्या ज्योती दाभेकर-विनिता पार्टे विजेत्या ठरल्या तर लावणी मिक्स सादर करणाऱ्या रूचिता दुदूस्कर आणि समिता दुदुस्कर उपविजेत्या ठरल्या. तृतीय क्रमांकाच्या मानकरी तृप्ती सुकाळे-श्रेया सुकाळे ठरल्या तर उत्तेजनार्थ पारितोषिक समृध्दी तांबे आणि यादवी सुतार यांच्या लल्लाटी भंडार गाण्यावरील नृत्याला देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *