रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बावीस वर्षीय आरोपी याने अलिबाग तालुक्यातील अल्प वयीन मुलींवर अत्याचार करीत तिला चार महिन्याची गर्भवती ठेवले असल्याची घटना समोर आली आहे.
प्राप्त महितीनुसार पेण तालुक्यात मार्च २०२४ते एप्रिल २०२५ दरम्यान पेण तालुक्यातील बावीस वर्षीय तरुण याने अलिबाग तालुक्यातील अल्प वयीन मुलगी हिला तिची बदनामी करण्याची धमकी देत तिला मारहाण करीत आरोपी याने पेण येथील घरी बोलावून घेत तिच्या मनाविरुद्ध वारंवार अती प्रसंग करीत जबरदस्ती करीत शारीरिक संबंध केल्याने पीडित मुलगी हिला आरोपी याने चार महिन्याची गर्भवती ठेवले आहे. याबाबत फिर्याद अल्प वयीन पीडिता हिने २८ऑगस्ट २०२५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पेण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उप निरीक्षक शिल्पा वेगुर्लेकर या करीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी याला अटक करण्यात आली असून पेण न्यायालयाने ६ सप्टेंबर २०२५ पोलिस कोठडी सुनावली आहे.