पेण-कळवे येथील 25 वर्षीय तरुण बेपत्ता

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
पेण तालुक्यातील कळवे गावातील अमन धनाजी ठाकूर (वय २५) हा तरुण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाला असून कुटुंबीय आणि पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त महितीनुसार, अमन हा आपल्या मावशी संगीता आत्माराम ठाकूर यांच्या ओढांगी (ता. पेण) येथील घरी सुमारे पंधरा दिवसांपासून राहत होता. ६ मार्च रोजी दुपारी सुमारे चार वाजता “मी कळवे येथील घरी जातो” असे सांगून तो घरातून बाहेर पडला, मात्र त्यानंतर तो परत आलेला नाही. या प्रकरणाची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात ‘मिसिंग पर्सन रजिस्ट्रेशन’ अंतर्गत करण्यात आली असून नोंद क्रमांक 0005/2026 असा आहे.
अमन घरातून निघताना अंगात पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेली होती. भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन बराच वेळ घालवण्याची त्याला आवड असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यामुळे परिसरातील शिवमंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांनी किंवा नागरिकांनी अशा वर्णनाचा तरुण दिसल्यास त्वरित संगीता आत्माराम ठाकूर (मो. ९८२३६२७६९३) किंवा वडखळ पोलीस ठाणे (०२१४३-२६९०३३) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.