
माथेरान | मुकुंद रांजाणे
पवित्र श्रावण महिन्यात अनेक भाविक जवळच्या शिव मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात तर अनेकांनी बारा ज्योतिर्लिंग पैकी एकाही ज्योतिर्लिंगाचे दर्शन बहुतांश जेष्ठ नागरिकांनी घेतलेले नसते त्यामुळे त्यांच्या मनात ही खंत असते.त्यांनाही दर्शनाची ओढ लागलेली असते.ही बाब ओळखून विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदे आणि त्यांचे बंधू उद्योजक भास्करराव शिंदे यांनी दि.२६ रोजी येथील जेष्ठ नागरिक,शासकीय सेवानिवृत्त मंडळी, लहान मुले त्याचप्रमाणे अन्य मित्र मंडळींना सोबत घेऊन एका खाजगी बसच्या साहाय्याने भीमाशंकर दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एकूण पन्नास जणांनी या महत्वपूर्ण सहलीचा मनमुराद आनंद घेत भीमाशंकर देवस्थान मंदिरात दर्शन घेऊन समाधान व्यक्त करत आयोजक दोन्ही शिंदे बंधूंचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
———————————————–
स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक चारित्र्य, एक कष्टकरी, आणि अंगी प्रामाणिकपणा असल्याने सलग तीन वेळा नगरपरिषदेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत असे निस्वार्थी भूमिकेचे दानशूर व्यक्तिमत्त्व असणारे शिवाजी शिंदे यांनी स्वखर्चाने एकूण ५० भाविकांची भीमाशंकर ट्रीप आनंदाने आयोजित केली त्यामुळे सर्वानाच आनंद झाला आहे. उत्तम प्रकारे सर्वांची खाण्यापिण्याची सोय करून सुखरूप आणले.त्यांचे बंधू भास्कर शिंदे यांनी सुध्दा या सहलीत सर्वांना भीमाशंकर मंदिरात उत्तम प्रकारे दर्शन घेण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली.
…कल्पना पाटील, निवृत्त मुख्याध्यापिका
———————————————–
नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्या माध्यमातून आम्हा ५० जणांसाठी दि.२६ बुधवार रोजी भीमाशंकर येथे अतिशय सुंदर आणि आनंददायी सहलीचे आयोजन करण्यात आले. श्रावण महिन्यात भगवान महादेवांचे दर्शन घेण्याचा लाभ आम्हा सर्वांना मिळाला ही आमच्यासाठी अत्यंत भाग्याची आणि समाधानाची गोष्ट आहे. आपल्या स्वखर्चातून, मेहनतीतून आणि मनापासून ही ट्रिप आयोजित करून आम्हा सर्वांना एक सुखद, आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल शिवाजी शिंदे यांचे आम्हा सर्व ५० जणांकडून मनःपूर्वक आभार
…राकेश कोकळे, सामाजिक कार्यकर्ते माथेरान
Related