चौक ग्रामपंचायतीचा स्वच्छता आणि आरोग्यवर्धनासाठी दुहेरी उपक्रम

चौक | अर्जुन कदम
ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीतील गावांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने कचराकुंडी व स्ट्रेचर वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सरपंच रितु ठोंबरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गाव परिसर स्वच्छ ठेवण्यासह आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यास हातभार लागणार आहे.
स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत गाव कचरामुक्त व प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांना ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी शासनाच्या थौरणानुसार चार वेगवेगळ्व्या रंगांच्या कचराकुंड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे घंटागाडी अथवा सफाई कर्मचाऱ्यांकडे कचरा देताना त्याचे वर्गीकरण करणे सुलभ होणार असून, कचरा मुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
गावपातळीवर आपत्कालीन वैद्यकीय प्रसंग किंवा दुर्घटना घडल्यास रुग्णांना तातडीने हलविता यावे, यासाठी हातनोलि, हातनोली पाडा, तारापूर, जांभिवली, चौक, कोल्हापूर पेठ,नवीन वसाहत बौद्धवाडा, मोरबे नवीन वसाहत, नानिवली,मोरबे कातकरवाडी, नम्राची वाडी, वरोसे कातकरवाडी, नानोसे कातकरवाडी, इरशालवाडी व चौक कातकरवाडी आदी ठिकाणी एकूण १४ स्ट्रेरचे वाटप करण्यात आले.
तसेच चौक बाजारपेठेसाठी ६०, तर सार्वजनिक ठिकाणी ८० अशा एकूण १४० कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले, या दुहेरी उपकरमामुळे परिसर स्वच्छ राहण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेलाही बळ मिळणार असल्याचे सरपंच रितु ठोंबरे यांनी सांगितले.शासनाच्या घनकचरा वर्गीकरण थोरणानुसार ग्रामस्थानी कचराकुंड्यांचा योग्य वापर करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे यांनी केले.
यावेळी उपसरपंच वृषाली आंबवणे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार, निखिल मालुसरे, लक्ष्मी वाघ, कल्पना सिंगवा,व्यापारी संघटना अध्यक्ष हर्षल हनुमंते, ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.