चंपाबाई डूंगरवाल यांचे १०८ व्या वर्षी निधन; पाचव्या पिढीतील सदस्यांना पाहण्याचा लाभ

PEN न्यूज ऑनलाइन टीम 
राजस्थान राज्यातील पाली मारवाड जिल्ह्यातील ठाकुरला येथील रहिवासी चंपाबाई हरतींमालजी डूंगरवाल यांचे बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी चेन्नई येथील सेल्लूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय १०८ वर्षे होते. त्यांच्या निधनाने डूंगरवाल कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
चंपाबाई डूंगरवाल यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१८ रोजी राजस्थान राज्यातील भीमालिया येथे झाला होता. प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या चंपाबाई यांनी आपल्या आयुष्यात कुटुंबाच्या तब्बल पाचव्या पिढीतील सदस्यांनाही पाहिले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय व आप्तेष्टांनी हळहळ व्यक्त केली.
चंपाबाई या पत्रकार अमुलकुमार जैन यांच्या आत्या होत्या. १०८ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य जगताना त्यांनी कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले. त्यांच्या निधनाने डूंगरवाल कुटुंबीयांसह नातेवाईक व परिचितांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.