खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक उप सरपंचपदी. भारतीय जनता पक्षाचे सौ. वृषाली पोळेकर यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उपसरपंच सौ.नैना झिंगे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाची आज पीठासीन अधिकारी तथा सरपंच रीतु ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली खास सभा घेण्यात आली. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर शेठ ठोंबरे, सरपंच रितुु ठोंबरे, पूजा हातमोडे, ग्राम पंचायत अधिकारी गणेश मोरे यांच्यासह अनेकानी त्यांचे अभिनंदन केले. महिला सक्षमीकरणासाठी व स्वच्च चौक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच यांनी सांगितले.