पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या कारकीर्दीनिमित्त तसेच सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने खालापूर येथे ‘सेवा संकल्प अभियान’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नवीन प्रशासकीय भवन, तहसीलदार कार्यालय, खालापूर येथे हे शिबिर होणार आहे. महसूल व इतर प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी विविध २२ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळविताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ९ सप्टेंबर २०२६ आणि महसूल विभागाच्या १७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना, महिलांना, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सातबारा उतारा, विविध दाखले तसेच महसूल व इतर विभागांशी संबंधित सेवा आणि योजनांची माहिती व लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
महसूल विभाग हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत, दिव्यांग व्यक्तींपासून अनाथांपर्यंत, विधवा व ज्येष्ठ नागरिकांपासून शेतकरी आणि उद्योजकांपर्यंत विविध घटकांचा महसूल विभागाशी संबंध येतो. शासकीय सेवा व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्यांना आवश्यक सेवा सुलभपणे मिळाव्यात, या उद्देशाने आयोजित या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर शिबीरात महसूल विभाग व इतर प्रशासकीय विभाग यांच्या सेवा देण्यात येणार आहेत.,
१) प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे जिवंत ७/१२ मोहिम.
२) गावठाणातील नागरीकांना स्वामित्व सनद वाटप करणे.
र) मुख्यमंत्री बळीराजा शेतापाणंद रस्ते उपलब्ध करणे
४)पत्र लाभाथयंना वन हक्क दावे मंजूर करणे
५) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे.
६) पात्र लाभाथ्यांना वन वन हक्क दावे मंजूर करणे.
७) जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र
ट) जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार जमिनीच्या मोजणीशी जोडणे.
९) जन्म मृत्यु नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे,
१०) मालमत्ता हस्तांतर नोद घेणे.
११) महिला शेतकरी यांना प्रमाणपत्र वाटप करणे,
१२) ७१२व८अ च्या नोंदी अद्यावत करणे,
१३) नव्याने नळ जोडणी देणे.
१४) मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे.
१्) प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देण.
१६) मालमत्त हस्तांतरणानंतर विद्यत जोडणीमध्ये नविन मालमत्त धारकांचे नाव नोंदविणे,