
कर्जत ग्रामीण ( मोतीराम पादीर ) :
धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धनगर व धनगड हे एकच आहेत.असे परिपत्रक काढण्याच्या हालचाली सुरू असल्याने याचा तीव्र विरोध करण्यासाठी व हक्काच्या पाच प्रमुख मागण्यांसह कर्जत-खालापूर मधील आदिवासी एकत्र येऊन कर्जत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली आहे. यावेळी कर्जत पोलीस ग्राऊंड येथे सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते.
धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये, रायगड जिल्ह्यात वन जमिनी,दळी अद्यापही आदिवासींच्या नावे करणे, रायगड जिल्हयात पेसा कायदा लागू करा.शाळा खाजगीकरण निर्णय रद्द करा.बोगस आदिवासी नोकर वर्गास बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करा.आरोग्य केंद्राची दुरावस्था सुधारा आशा प्रमुख मागण्या घेऊन दि. ७ ऑक्टोबर रोजी आदिवासी समन्वय समिती यांच्या माध्यमातून कर्जत- खालापूर पेण, मुरबाड, आलिबाग रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव हे कर्जत मधील छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठया संख्येने एकत्र जमुन छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार आर्पण करून सदर आदिवासी आक्रोश मोर्चाला सुरवात करण्यात आली.
मुख्यबाजार पेठ ते कपालेश्वर मंदिरमार्गे डॉ.आंबेडक स्मारकास पुष्पहार अर्पण करून कर्जत पोलीस ग्राऊंड येथे सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख आदिवासी नेत्यांची या सभेत भाषणे दोऊन या भाषणांच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात टीका शस्त्र डागत सरकार विरोधात मोठया प्रमाणात निषेद व्यक्त करण्यात आला.
सभेची सांगता होताच आदिवासी नेत्यांसह बांधवांचे शिस्त मंडळ यांनी प्रांत अधिकारी नसल्याने त्यांचे निवेदन हे कर्जत तालुक्याचे तहसिलदार धनंजय जाधव यांचे कडे मागण्याचे निवेदन देत, सदर निवेदन हे आपल्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करावे अशी विनंती करण्यात आली.तर या आदिवासी आक्रोश मोर्चाला नारायण डांमसे,परशुराम दरवडा, देवराम लांडे, मारूती वायळ, संजय भंगे, सोमनाथ वाघमारे, विलास ढोले, जयवंत शिद, सचिन वाघमारे, आदीसंह आदीवासी कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
—————————————————-
आमचा आदिवासी बांधव संतापले व पेटून उटलेला आहे. हातात काठी कुऱ्हाड झेंडे घेऊन समाज रस्त्यावर उतरत आहे. सरकार आमचा किती अंत पहाणार आहे. सरकारनी पेसा कायद्याचा जिआर त्वरीत बदलावा, पुढे आचारसहिता लागणार असली तरी आमची आंदोलने सुरूच राहतील. तर येणाऱ्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा समाजाने निर्णय घेतला तर आम्ही बहिष्कार देखील टाकू.
….देवराम लांडे,अध्यक्ष,आदिवासी समाज पुणा जिल्हा परिषद विभाग,
Related