माथेरान रेल्वे स्टेशन मधील पॉड हॉटेलचे पत्रे वाकले

माथेरान रेल्वे स्टेशन मधील पॉड हॉटेलचे पत्रे वाकले

माथेरान ( मुकुंद रांजणे ) : 

माथेरान मधील पर्यटन बहरत असून ऐन सुट्ट्यांच्या हंगामात साध्या खोल्या सुध्दा वेळेवर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे पर्यटकांना माघारी जाण्याची वेळ सुध्दा येते. याकामी मध्य रेल्वेच्या माध्यमातून माथेरान रेल्वे स्टेशन भागात जुन्या मजबूत इमारतीमध्ये पॉड हॉटेल बांधकामास सुरुवात केली आहे. परंतु सद्यस्थितीत होत असलेली कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची केली जात आहेत.
जुन्या इमारतीवर लोखंडी शेड उभारून त्यावर सुरुवातीला जुने पत्रे लावण्यात आले होते. याबाबत वृत्त PEN न्यूज मध्ये झाल्यानंतर नवीन पत्रे टाकण्यात आले आहेत पण हे पत्रे सुध्दा निकृष्ठ दर्जाचे असल्याने वाकलेले आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या कामांबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
जवळपास काही कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येणार आहे. आणि अशाप्रकारचे निकृष्ट कामे केल्यास याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.
शंभरी पार केलेले हे रेल्वे स्टेशन हेरिटेज मध्ये येत असून हेरिटेज कमिटीने या कामास परवानगी दिली आहे का ? दिली असल्यास कामे निकृष्ठ दर्जाची का होत आहेत ? पॉड हॉटेलची ही संपूर्ण होत असलेली कामे सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने यावर एखादी कमिटी नेमावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *