Alibag : विष प्राशन करून पर्यटक महिलेची कुरुळ येथे आत्महत्या

Suicide

अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : 

रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कूरुळ येथील प्रिव्ही स्टे कंपनीच्या एकाक्षर हॉटेलमध्ये नेहा अविनाश पोतदार(वय-३४ वर्षे, रा. बी/५०१ कनिष्का, जी.ई. लिंक सोसायटी, राम मंदिर रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई ४००१०४ ) या पर्यटक महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात पंकज राजेंद्र जयस्वाल(२७ वर्षे, प्रिव्ही स्टे एकाक्षर हॉटेल, गॅस गोडावून जवळ, कुरूळ, अलिबाग. मूळ राहणार – कुरेथू, गौरा जौनपुर. गौरा बादशहपुर, उत्तर प्रदेश.२२२१३३) यांनी तक्रार दाखल केली आहे.
मयत नेहा पोतदार या सु संस्कृत घरातील महिला असून त्याचे कुटुंबीय एका धार्मिक परिवाराशी जोडलेला आहे. नेहा पोतदार ह्या कूरुळ येथे येथे येण्यापूर्वी काही दिवस हिमाचल यमुना येथे होत्या. तेथून त्यांनी मेक माय ट्रीप या ॲपद्वारे कूरुळ येथील प्रिव्ही स्टे कंपनीच्या एकाक्षर हॉटेलची बुकिंग केली होती. नेहा पोतदार या ३० सप्टेंबर २०२४ रोजी सायं.साडे सहाच्या सुमारास आली होती. नेहा पोतदार ह्या एकाक्षर हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांना हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर एक देण्यात आली होती. नेहा पोतदार ह्या रुम मध्ये घेतल्यापासून बाहेर पडल्या नाहीत.
नेहा पोतदार यांचा २ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता रूम सोडण्याची वेळ होती. मात्र नेहा पोतदार यानी मध्ये अधिक वेळ कोणतीही कल्पना व दिला त्या रुममध्येच राहिल्या होत्या म्हणून सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास त्याना हॉटेलच्या दूरध्वनीवरून सम्पर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यावेळी नेहा पोतदार यांच्या भावाचा कॉल पंकज जयस्वाल यांच्या भ्रमणध्वनीवर आला. त्यांनी सांगितले की नेहा पोतदार ह्या आपल्या हॉटेलमध्ये राहण्यास आहेत त्या फोन उचलत नाही म्हणून बघून या असे सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार पंकज जयस्वाल हे नेहा पोतदार ज्या रूम मध्ये थांबले होते त्या ठिकाणी गेले आणि पाहिले असता नेहा पोतदार यानी आतून कडी लावली होती.
नेहा पोतदार यांच्या भावाला आतून कडी असल्याचे सांगितले असता त्यांनी सांगितले की दरवाजा तोडा. म्हणून पंकज जयस्वाल आणि हॉटेलमधील सहकारी महेश व राज यांना सदर रूमजवळ बोलावून रूमचा दरवाजा लाथ मारून उघडुन पाहिले असता नेहा पोतदार हया रूममधील बेडवर झोपलेल्या अवस्थेत होत्या त्यांच्या कानामध्ये मोबाईलचे हेडफोन असून त्यांची मान एका बाजूला होती व त्यांच्या तोंडातुन फेस बाहेर आला होता. तसेच नेहा पोतदार यांच्या बेडच्या बाजूला असलेल्या टेबलावर एक सफेद रंगाची निळया रंगाची झाकण असलेली बाटली असून बाटलीच्या खाली “POISON DO NOT TOUCH! “अगे कागदावर लिहिलेले होते.
तसेच त्याच्या बाजुला आणखी कागदाच्या चिठठ्या होत्या. त्यामधे त्यांनी हॉटेल मध्ये खाण्यास जे खाद्य पदार्थ मागवले होते त्याचे बिल पेड केले आहे तसेच नेहा पोतदार यानी आत्महत्या केल्यामुळे ज्यांना कोणाला त्रास सहन करावा लागला आहे त्याची माफी मागण्याची एक चिठ्ठी होती तर चौथी चिठ्ठी मध्ये आत्महत्येमुळे कोणाला जबाबदार धरू नये असा आशयाची चिठ्ठी होती. पंकज यांनी नेहा पोतदार यांनी उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यां बेशुद्ध पडल्या असल्याचे लक्षात आले. पंकज यांनी तत्काळ प्रिव्ही स्टे कंपनीच्या एकाक्षर हॉटेलमधील बुकिंग ऑफिसचे विकी तलवार यांना जावुन सांगितले.
विकी तळवर यांनी हॉटेल मालकांना सांगितल्याने हॉटेल मालकांनी ताबडतोब अलिबाग पोलीस ठाणे येथे फोनद्वारे सम्पर्क साधून हॉटेल मध्ये घडलेली सर्व घटना पोलीसांना कथन करून हॉटेलमध्ये पाचारण केले. त्यानंतर पोलिस तेथे आल्यानंतर पोलिसांनी तेथे रुग्णवाहिका तेथे बोलावून घेउन नेहा पोतदार यांना बेशुध्द अवस्थेत उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे आणले असता अपघात विभागात डॉक्टरांनी तिला दुपारी ०१:३५ वाजता तपासून ती उपचारापुर्वीच मयत घोषित केले .
याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात ६३/२०२४नुसार आकस्मित मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधीक तपास पोलीस निरीक्षक किशोर साले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
काही वर्षांपूर्वी अलिबाग शहरातील ब्लॉसम कॉटेज येथे विवाह बाह्य संबंध असणारी प्रेमी युगुाला यांनी दोन बालकांना मारून दोघांनी आत्महत्या केली होती. तसेच किहीम येथे आईचे विवाह बाह्य संबंध असल्याने तिने तीन व पाच वर्षाच्या मुलाना गुदमरून मारले होते. येणाऱ्या पर्यटकपैकी काही पर्यटक हे जाणीवपूर्वक कोणत्यातरी हेतूने येथे येतात.आणि त्यांचा हेतू साध्य करीत असतात.असा प्रकारच्या घटनेत देखील वाढ होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *