श्रीवर्धन तालुक्यातील मौजे वेळास येथील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे असणाऱ्या प्रांगणात पावसात अतिशय दलदलीची अवस्था झाली होती.विद्यार्थ्यांना अक्षरशः बेडूक उड्या मारत आणि मोठी कसरत करत वर्गात जावे लागत असे.शाळेच्या मुख्याध्यापकांनी पावसाळ्यात आपल्या शाळेच्या परिसरात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना त्रास आणि अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब शाळा व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आल्या नंतर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,माजी ग्रामंचायत सदस्य धवल तवसाळकर यांनी आपल्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने हे काम हाती घेऊन ते पूर्ण देखील केले.
आपल्या शाळेचा परिसर अधिक सुंदर,स्वच्छ व सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीस्कर व्हावा,या उद्देशाने आदर्श मराठी शाळा, वेळास येथे लोकसह भागातून तब्बल दीड लाख रुपये खर्चाचे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या कामासाठी ग्रामस्थ सुरेश धोपट माजी उपसरपंच,वेळास, तेजस दळवी आणि श्रिया शैलेश कासेकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.लोकसह भागातून झालेल्या या कामामुळे शाळेचा परिसर अधिक स्वच्छ,सुंदर आणि सुरक्षित झाला असून शाळेच्या सौंदर्यातही भर पडली आहे.झालेल्या शाळेच्या विकासा साठी ग्रामस्थ आणि मित्र परिवाराने घेतलेला पुढाकार हा नक्कीच कौतुकास्पद असून,प्रेरणादायी आहे.
या स्तुत्य उपक्रमा बद्दल शाळेचे मुख्याध्यापक सतीश शिकारेसर यांनी शाळेच्या वतीने तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.रंगीबेरंगी पेव्हरब्लॉक लागल्याने प्रांगणाची अधिक शोभा वाढली असून.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव,हास्य आणि समाधान झालेल्या कामाची पोच पावती देत आहेत.