PEN : रावे गावातील खाडीकिनारी दारू अड्ड्यावर दादर सागरी पोलिसांची धडक कारवाई

PEN : रावे गावातील खाडीकिनारी दारू अड्ड्यावर दादर सागरी पोलिसांची धडक कारवाई
अलिबाग | अमुकुमार जैन 
रावे गावच्या पूर्वेकडील खाडीकिनारी कांदळवन भागात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर दादर सागरी पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ₹८३,५०० किमतीचे रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले.
गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ सकपाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक फौजदार संदेश ठाकूर, पोलीस हवालदार अतीश पाटील, नंदन पाटील, नितीश पाटील, योगेश म्हात्रे तसेच पोलीस शिपाई मयूर पाटील आणि ऋषिकेश आगम यांनी कारवाईत सहभाग घेतला. ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रसायन, ड्रम्स, हंड्या, पाईप्स आणि दारू तयार करण्याचे साहित्य आढळले, ज्याचा पंचनामा करून घटनास्थळीच नाश करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस शिपाई ऋषिकेश आगम यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून, गुन्हा रजिस्टर नंबर 67/2025 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(क) व 65(फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू धंद्यांना मोठा आळा बसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *