शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खांदा वसाहत शहर शाखेतर्फे गेली सात वर्षे सातत्याने महिलांना भाऊबीज साठी साडीवाटप व बाकीच्यांना मिठाईवाटप करण्यात येते. यंदाही मोठ्या प्रमाणात माता-भगिनींना वाटप करण्यात आले आहे.
खांदा वसाहत शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राबविला आज आला असून, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपमहानगरप्रमुख रामदास गोंधळी, उपशहर प्रमुख दत्तात्रय मामुलकर, विभाग प्रमुख दौलत होटकर, कार्यालय प्रमुख संदीप तोरणे, उपकार्यालयाप्रमुख नागम, महिला शहर संघटिका सानिका मोरे, संपर्क संघटिका अर्चना क्षिरसागर, युवासेना सुशांत सावंत, अभेश ओंबळे, सिद्धेश मोकल व सर्व शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुख व इतर सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.