Mumbai-Goa Highway Accident: व्हॅगनार कारने ट्रकला दिलेल्या धडकेत वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा मृत्यू !

Mumbai-Goa Highway Accident: व्हॅगनार कारने ट्रकला दिलेल्या धडकेत वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा मृत्यू !
महाड (मिलिंद माने) :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका दररोज चालू असताना आज सायंकाळी सहाच्या सुमारास महाड कडून पुण्याकडे जाणाऱ्या व्हॅगनार कार ने मालवाहतूक ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेमध्ये वैद्यकीय महिला अधिकारी जागी मृत्यू पावल्याची घटना लाख पाले गावाजवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की. महाड कडून मुंबई बाजूकडे जाणाराMH.४३.Y.६०५६ हा मालवाहतूक ट्रक महामार्गावर धावत असताना पाठीमागून येणाऱ्या व पुण्याकडे जाणाऱ्याMH.१४.MC९८५९ या व्हॅगनार कार ने मालवाहतूक ट्रक ला पाठीमागून जोरात दिलेल्या धडकेत कार मधील डॉ. प्रियंका भास्कर आहेर (वय – ३२ रा. बीड सध्या रा.पूणे) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असणारे डॉ. विशाल रमेश बड़े( वय – ३० रा. अनपटवाडी पारगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड ,सध्या रा.पूणे) हे जखमी झाले आहेत.
महामार्ग वाहतूक शाखा महाड येथील वाहतूक पोलिसांना याबाबतची घटना कळताच त्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन व्हॅगनार कार मधून प्रवास करणाऱ्या व जखमी झालेल्या डॉक्टर विशाल बडे यांना रुग्णालयात हलविण्यास मदत केली. 
याबाबत गोरेगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक एस. एन. रासकर करीत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *