जगप्रसिद्ध असलेल्या थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान मधील दस्तुरी येथील असलेल्या धोबी तलावातील ऐन सुरू झालेल्या उन्हाळ्यात पाणी हे आटले असल्याने मात्र दस्तुरी ते माथेरान बाजारपेठ असा मालवाहतूक घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून, पाण्या पासुन मालवाहतूक घोडयांचे पिण्याच्या पाण्यापासुन हाल होत असल्याचे हृदयविधारक चित्र समोर येत असल्याने, या मालवाहतूक घोडयांच्या पिण्याच्या पाणी समस्याकडे प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने, मात्र प्रशासन घोडयांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणार का या कडे मालवाहतूक घोड्यांच्या मालक – चालक संघटनेचे लक्ष लागले आहे.
माथेरान हे थंड हवेचे जगप्रसिद्ध ठिकाण असल्याने व माथेरानच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माथेरानमध्ये ब्रिटीश कालीन असलेल्या कायदयानुसार वाहनाना प्रवेश बंदी असल्याने, माथेरान मधील लागणाऱ्या जीवनाशक वस्तू व बांधकामासाठी लागणाऱ्या मालाची मालवाहतूक ही पूर्वीपासुन दस्तुरीनाका ते माथेरान बाजारपेठ व माथेरान मधील असलेल्या हॉटेल व्यावसायीकांपर्यंत या मालवाहतूक घोडयावरून केली जात आहे. तर दस्तूरी येथील असलेल्या वाहानतळाच्या खालच्या बाजूला असलेल्या जुन्या धोबी तलावावर या मालवाहतूक घोड्यांना पाणी पिण्यासाठी नेले जाते.
मात्र यंदाचा उन्हाळा सुरू झाल्याने यंदा हे धोबी तलाव अटले असल्याने, मात्र या मालवाहतूक घोडयांची पिण्याच्या पाण्यापासुन वणवण सुरू झाली असल्याचे हृदयविधारक चित्र समोर येत आहे. तर या संदर्भात आम्ही या पूर्वी माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचे कार्यरत प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी कोकरे यांना आमच्या मालवाहतूक घोडयांसाठी नळाची व्यावस्था करून देण्याची व त्यासाठी आम्ही येणारे पाण्याचे बिल भरण्यास तयार असल्याची मागणी केली होती. परंतू अद्याप पर्यंत आमची मागणी पूर्ण झाली नसुन प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे, तसेच या धोबी तलावातून एम टी डी सी कडून पंपाव्दारे पाणी उचला केला जात असल्याने, या धोबी तलावाची पाणी पातळी खाली जाऊन ऐन उन्हाळ्यात हे तलाव अटले असल्याने आमच्या मालवाहतूक घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याचे व आमच्या मालवाहतूक घोडयांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करावी लागत असल्याचे मालवाहतूक मालक चालक यांच्या कडून बोलले जात आहे.
यामुळे मालवाहतूक घोडयांच्या पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने, मात्र प्रशासन घोडयांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणार का या कडे मालवाहतूक घोड्यांच्या मालक – चालक संघटनेचे लक्ष लागले आहे.