Karjat : विजयभूमी विद्यापीठामध्ये पाचवा दीक्षांत समारंभ; ५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

Karjat Vijay Bhumi Vidyapitha
कर्जत-ग्रामीण ( मोतीराम पादीर ) : 
कर्जत तालुक्यातील जामरूख शेवटच्या टोकाला असलेल्या विजयभूमी विद्यापीठामध्ये दिनांक १९ ऑक्टोबर,शनिवार रोजी सकाळी १० वाजता पाचवा दीक्षांत समारंभ साजरा झाला.
या विजयभुमी विद्यापीठांमधील पाचव्या  दीक्षांत समारंभ मध्ये १२ विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी,१४ विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आणि फाईन आर्टस् म्युझिक आणि ६ विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ बिसनेस ऍडमिनिस्ट्रेशन ही पदवी देण्यात आली.तसेच २० विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ बिसनेस ऍडमिनिस्ट्रेशन ही पदवी देण्यात आली. एकूण ५२ विद्यार्थ्यांना पदवी मिळाली असून पद्मभूषण डॉ.जहीर इसहाक काज़ी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी विजयभूमी विद्यापीठाचे अध्यक्ष  संजय पडोदे आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अतिश चट्टोपाध्याय,  डॉ.रविकेश श्रीवास्तव उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे प्रशासकीय मंडळ सदस्य कल्पना पडोदे, सदस्य  डीन.डॉ.वेंकटेश सुंकड, डीन VSST,डॉ.अनिर्बन घोष JAGSoM , प्रा.विनय प्रभाकर बंडी TSM उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.शरद पुलाते रजिस्ट्रार,अतुल झोपे,कंट्रोलर ऑफ एक्साम , राजू पुजारी ऍडमिन हेड,भुषण पिंपरकर मॅनेजर स्टुडंट्स अफेअर्स व सर्व विजयभूमी स्टाफ पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *