डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO), सेंटर फॉर फायर, एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्न्मेंट सेफ्टी (CFEES) नवी दिल्ली येथे अॅप्रेंटिस अॅक्ट 1961 अंतर्गत आयटीआय अॅप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून एकूण 38 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
भरती अंतर्गत ट्रेडनिहाय रिक्त पदं :
मेकॅनिक मोटर वेहिकल (MMV) – 5
ड्राफ्ट्समन (सिव्हील) – 4
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 3
इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक – 4
लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट) – 10
आणि कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – 12 पदांचा समावेश आहे.
पात्रतेनुसार एनसीव्हीटी मान्यताप्राप्त आयटीआयमधील 2 वर्षांचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असून COPA ट्रेडसाठी 2 वर्षांची अट लागू नाही. तसेच पात्रता परीक्षा 2023 पूर्वी उत्तीर्ण केलेली नसावी.
उमेदवारांचे वय १० डिसेंबर २०२५ रोजी १८ ते २७ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा असून प्रशिक्षणादरम्यान दरमहा रु. 9,600/- स्टायपेंड देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 10 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावेत.