पेण तालुक्यातील कामार्ली येथे असलेले हेटवणे धरण शुक्रवार दि.२५ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता ८२.०० मीटर पातळी गाठत ८२.९२% क्षमतेने भरले आहे. यामुळे धरण सुरक्षित असून, उद्या २६ जुलै रोजी सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग कधीही सुरू होण्याची शक्यता आहे.
धरणाची संकल्पित सांडवा पातळी ८३.१० मीटर असून, आजच्या दिवसाचा पाऊस १३८ मिमी तर आतापर्यंतचा एकूण पाऊस १८१९ मिमी इतका नोंदवला गेला आहे. धरणाची पूर्ण संचय पाळी ८६.९० मीटर असून, धरणाचा उपयुक्त साठा १४४.१८ दलघमी इतका आहे.
सद्यस्थितीत धरणात १२२.३०४ दलघमी पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त साठा १२९.७९४ दलघमी आहे. त्यामुळे निचऱ्याची पूर्वसूचना म्हणून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.