सोन्याची नाणी विकत घेण्याच्या बहाण्यानं एका टोळीनं घातला पाच लाखाचा गंडा !

Gold Coin
पनवेल :
कमी किमतीत सोन्याची नाणी विकत देण्याच्या बहाण्याने एका टोळीने खारघरच्या कोपरा गावात राहणाऱ्या व्यक्तीकडून पाच लाख रुपये उकळून त्याला बनावट सोन्याची नाणी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
खारघरमधील व्यक्तीची फसवणूक खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करणारी एक व्यक्ती कामावरून घरी परतत होती. खारघर लिटिल वर्ल्ड मॉलसमोर आरोपी टोळीतील एका २० वर्षीय तरुणाने त्याच्याजवळ असलेले सोन्याचे नाणे विकण्याबाबत चौकशी केली होती. नंतर ते नाणे देऊन त्याची किंमत त्याला सांगण्याची विनंती केली होती. हे सोन्याचे नाणे २४ कॅरेटचे १.४ ग्रॅम वजनाचे व ८६०० रुपये किमतीचे असल्याचे सोनाराने सांगितल्यानंतर या व्यक्तीने आरोपी तरुणाला तसे कळवले.
त्यावर आरोपीने अशी अनेक सोन्याची नाणी खोदकाम करताना आढळल्याचे त्याने सांगितले. ही नाणी विकायची असल्याचेही सांगितल्यानंतर आरोपी
त्रिकुटातील एका महिलेने या व्यक्तीला एका पिशवीत असलेली अनेक सोन्याची नाणी दाखवली. त्यातील दोन नाणीही त्याला दिली. ती सोन्याची नाणीही खरी असल्याचे आढळल्यानंतर या व्यक्तीने पाच लाख रुपये जमवले. काही दिवसांनंतर ते पैसे दिल्यानंतर आरोपी महिलेने सोन्याची नाणी असलेली पिशवी दिली. मात्र सोनाराकडे जाऊन तपासणी केली असता, सर्व नाणी बनावट आढळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *