सोगांव येथे उर्दू व मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Sogav zendavandan
सोगाव (अब्दुल सोगावकर) :
भारताच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील राजिप उर्दु, उर्दू हायस्कूल व राजिप मराठी शाळेत १५ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी एकत्रित काढलेल्या प्रभातफेरीमध्ये तिन्ही शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका सहभागी झाले होते. नंतर प्रत्येक शाळेतील पटांगणावर मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका यांनी ध्वजारोहण केले, यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते तसेच भाषणे, संविधान वाचन व राज्यगीते सादर केली. शासनाच्या परिपत्रकानुसार १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वजावर विद्यार्थ्यांनी विविध कलागुण व कलाविष्कार सादर केले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, स्थानिक माजी ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षकवर्ग, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, सोगाव पंचक्रोशीतील इतर मान्यवर व ग्रामस्थ तसेच तिन्ही शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व उपस्थितांना खाऊ वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *