नागोठणे लायन्स क्लब तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त पोहण्याची स्पर्धा उत्साहात; साहिल, मयूश, जानवी प्रथम

नागोठणे लायन्स क्लब तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त पोहण्याची स्पर्धा उत्साहात
नागोठणे (महेंद्र माने) : 
मोटेच्या तलावात स्वातंत्र्यदिनाचे औचित्त साधून शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी नागोठणे लायन्स क्लब आयोजित लायन्स क्लबचे अध्यक्ष सखाराम ताडकर,सेक्रेटरी डॉ.अनिल गीते तसेच विवेक सुभेकर, यशवंत चित्रे, सुधाकर जवके व किशोर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आलेल्या पोहण्याच्या स्पर्धेत मोठ्या गट साहिल कुथे,छोट्या गट मयूश ठाकूर तर मुलींचा गटामध्ये जानवी पाटील हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
यावेळी लायन्स क्लबचे प्रकाश जैन,दौलतराम मोदी,विलास चौलकर,जयराम पवार,सुनील कुथे,दीपक गायकवाड,विजय शहासने,विशाल शिंदे,दीपक लोणारी,ॲड.स्मिता कुथे, सुजाता जवके,विद्या म्हात्रे यांच्यासह क्लब पदाधिकारी,सदस्य व नागरिक उपस्थित होते.
तीन गटात घेण्यात आलेल्या सदरील स्पर्धेत एकूण 25 स्पर्धकांनी भाग घेतला असून त्यामध्ये स्पर्धक असलेल्या होता. 07 स्पर्धक असलेल्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक- साहिल कुथे, द्वितीय क्रमांक- सुजल भोय,तृतीय क्रमांक- प्रिन्स पारंगे याने पटकावला. 14 स्पर्धक असलेल्या छोट्या गटात प्रथम क्रमांक- मयुश ठाकूर, द्वितीय क्रमांक- वेद कुथे, तृतीय क्रमांक- रियांश ठाकूर याने पटकावला. चार स्पर्धक असलेल्या मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक- जानवी पाटील,द्वितीय क्रमांक- प्रेषिता पाटील,तृतीय क्रमांक- पलक पाटील हिने पटकावले असून उत्तेजनार्थ आराध्या जवके हिला बक्षीस देण्यात आले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन तसेच सर्व स्पर्धकांना चॉकलेट देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत सर्व स्पर्धकांच्या सुरक्षितेसाठी सहा लाइफ गार्ड, हवेची ट्यूब, रस्सी, औषधोपचार पेटी तसेच डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांचे आभार डॉ. अनिल गीते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *