अतिशय गरीब परिस्थीत शिक्षण घेऊन सुधाकर काशीनाथ पिंगळे यांनी शिक्षकाची नोकरी करत अनेक विद्यार्थी घडविले त्यांना मिळालेली सहचारिणी सुशीला पिंगळे या सुद्धा शिक्षिका असल्याने त्यांनी सुद्धा अनेक उत्तम विद्यार्थी घडविले. समाजात वावरत असतांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. शिक्षकाची नोकरी म्हटलं की कासवाचं बिर्हाड बदली झाली की जिथे शाळा मिळेल तेथे गुण्या गोविंदाने कुठलाही विचार न करता मुलाचं भविष्य घडविण्यासाठी झटायच. आशा या दांपत्याच्या विवाहाला १४ मार्च रोजी ५० वर्षे पूर्ण आहेत त्या निमीत्ताने त्यांचा मुलगा सुशीलकुमार पिंगळे व मुलगी सुविधा मिलिंद पाटील यांनी या लग्नाच्या वाढदिवासाचा सोहळा आयोजित करण्याचे योजिले.
दरम्यान, गुरुवार दि. १४ रोजी त्यांच्या राहत्या घरातून सुधाकर काशीनाथ पिंगळे व सुशिला सुधाकर पिंगळे या दाम्पत्याची मिरवणूक ही ढोल ताशांच्या गजरात रविराज फार्म हाऊस पर्यन्त काढण्यात आली. अगदी देव ब्रम्हणाच्या साक्षीने अंतरपाट धरून मंगल अष्टक म्हणत सप्तपदी करत पुन्हयांदा सुधाकर व सुशीला पिंगळे यांचं लग्न लावण्यात आलं. त्यानंतर केक कापून विवाहाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यासाठी त्यांनी आमंत्रीत केलेले त्यांचे वर्ग मित्र- मैत्रिणी, शिक्षकी पेशातील सहकारी वर्ग, जेष्ठ नागरिक, भावबंद तसेच पेणचे कुर्डुसकर रवाशी मंडळ आदींनी या सोहळ्याचा आनंद लुटला.
नेहमी प्रमाणेच लग्न लागल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्याचा सुद्धा सर्वांनी लाभ घेतला. त्यानंतर लगेचच मंडप हॉलमधून रिती रिवाजा प्रमाणे सजविलेल्या रथातून वाजत गाजत राहत्या घरापर्यंत वरातीची मिरवाणूक काढण्यात आली. सदर या सोहळ्यासाठी पेणमध्ये स्थीत असणारे पेणचे कुर्डूसकर यांनी अपार मेहनत घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविली. अशी माहिती अलंकार पिंगळे यांनी वृत्त वाहिनीला दिली.