अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील टाकादेवी येथील मुख्य रस्त्यापासून लक्ष्मी नारायण विद्यामंदिर कडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट) विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट) विधानपरिषद अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते चारुहास मगर, अमित नाईक, वाडगांव ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र भगत, मापगाव माजी सरपंच उनिता थळे, माजी उपसरपंच अनिता शिंदे, समद कुर, लक्ष्मी नारायण विद्यामंदिर माजी मुख्याध्यापक दातार सर, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, चंद्रकांत खोत, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, राजेंद्र घरत, विवेक जोशी, संजय शिंदे, सुरेश राऊत, हेमंत नेमन, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, युवा नेता सूचित थळे, अक्षय जाधव, मापगांव विभाग महिला बचत गट अध्यक्षा शलाका थळे, ज्येष्ठ गुरुवर्य केशव चांदोरकर सर, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, संदीप थळे तसेच मापगाव पंचक्रोशीतील इतर पुरुष व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन कार्यक्रमात आमदार तटकरे यांनी सांगितले की, टाकादेवी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी युवा नेता सूचित थळे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे अनिकेत तटकरे यांनी कौतुक केले, तसेच खासदार सुनील तटकरे यांनी झालखंड ते किहीम हा अकरा किलोमीटरचा रस्ता पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून ७ कोटी ८० लाखाच्या खर्चाचा सदर रस्ता मंजूर करून तो प्रगतीपथावर आहे, तसेच जलजीवन योजनेच्या माध्यमातून कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून तीदेखील प्रगती पथावर आहे, यापुढेही या भागातील विविध विकासकामे मंजूर करून ते पूर्ण करण्यासाठी सूचित थळे याला आमच्यासोबत द्या, तो एक उभारता कार्यकर्ता आमच्या बरोबर आल्यास आम्ही अधिक प्रमाणात अधिक जोमात विकास कामे करू शकतो, असे शेवटी सांगितले.
या भूमिपूजन कार्यक्रमात सूत्रसंचालन विवेक जोशी यांनी केले.