संपत्ती सर्वांकडे आहे, मात्र तिचा सर्वसामान्य जनतेसाठी विनियोग करतो, तोच खरा सामाजिक कार्यकर्ता – आमदार महेश बालदी

चौक | अर्जुन कदम
आज धनदौलत सर्वांकडे आहे, मात्र सर्वसामान्य जनतेला आपल्या संपत्तीतून मदत करतो, सामाजिक कार्य करतो तोच खरा सामाजिक कार्यकर्ता म्हणून अशोक छाजेड यांचा उल्लेख होतो, असे गौरव उदगार उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी काढले.
अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चौक जिल्हा परिषद विभागातील kप्राथमिक शाळेतील १६०० विद्यार्थी यांना उच्च दर्जाचे शैक्षणिक साहित्य, यात स्कूल बॅग,छत्री, वह्या, पेण पेन्सिल आणि इतर साहित्य वाटपाचा कार्यक्रम एन डी स्टुडिओ येथे भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे व माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी सुनियोजित आखलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थी यांना एन डी स्टुडिओ दाखविण्यात येऊन सर्वांची नाश्ता जेवण याची सोय करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आपण विधानसभा मतदार संघात विकास कामे करीत असून, अटल सेतू ते चौक या जोड मार्गाच्या कामाला गती मिळाली असून भविष्यात आपल्या मतदार संघात आदिवासी बांधव झोपडीत राहणार नसल्याचे सांगून सुमारे चार हजार घरकुल मंजुरी घेतली असून आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत बैठक झाल्याचे सांगून येथील सर्वच कार्यकर्ते प्रामाणिक कार्य करीत असल्याने असे जनहिताचे कार्यक्रम होतात असे आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत छजेड यांनी करून भविष्यात सुधीर ठोंबरे, मोतीराम ठोंबरे, सरपंच रितू ठोंबरे यांच्या सहकार्याने स्थानिक जनतेच्या हिताचे काम सुरू केले असे सांगितले. कार्यक्रमास उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी आमदार देवेंद्र साटम, सभापती कृष्णा पारंगे, जिल्हा परिषद सदस्या नेहा पारंगे, गटविकास अधिकारी संदीप कराड, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल, सौ. छाजेड, गटशिक्षण अधिकारी राजवर्धन नाईक,सुधीर ठोंबरे, प्रवीण मोरे, मोतीराम ठोंबरे, भूषण परांगे,उपसरपंच नैना झिंगे, विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल, विद्यार्थी,शिक्षक,पालक,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमा साठी सर्व विद्यार्थी,शिक्षक, पालक यांचे यशस्वी आयोजन दीपक ठाकूर आणि जितू ठाकूर या शिक्षकांनी अतिशय मेहनतीने केले.