श्रेयस तळपदे यांच्याहस्ते पोलादपूर तालुक्यातील उदय मधुसूदन खरे यांचा सत्कार

Sheyash Talapade
पोलादपूर (शैलेश पालकर) :
तालुक्यातील विविध आजार व दुखापतीच्या असंख्य रूग्णांना भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रूग्णालयापर्यंत पोहोचवून आरोग्य समाजसेवकाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्वांनीच रूग्णालयाचे रूप पालटले तरी हेतू बदलला नसल्याचे दाखवून दिले आहे, असे उदगार अभिनेते श्रेयस तळपदे यांनी व्यक्त केले.
भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रूग्णालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन अभिनेते श्रेयस तळपदे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रेयस तळपदे यांच्याहस्ते पोलादपूर तालुक्यातील उदय मधुसूदन खरे यांचा सत्कार आरोग्यसमाजसेवकाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल करण्यात आला.
यावेळी श्रेयस तळपदे यांनी 15 वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र डेरवण येथे आलो  त्यावेळीची रचना सर्वत्र बदललेली असून श्रीक्षेत्र सर्वप्रकारे बदलले आहे. मात्र, मानवसेवा रूग्णसेवेसाठीचा हेतू कायम असल्याबद्दल विशेष कौतुक करताना वालावलकर रूग्णालय, मेडीकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फिजिओथेरेपी, न्यूक्लीयर मेडीसीन, लिनियर ऍक्सीलरेटर, स्पोटर्स ऍकेडमी अशा सर्व विभागांना भेट दिल्यानंतर रूग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा व डॉक्टर्स नर्सेस तसेच सर्वांचे भरभरून कौतुक केले.
याप्रसंगी श्रेयस तळपदे यांच्याहस्ते वालावलकर रूग्णालयात उपचाराचा मार्ग दाखविणाऱ्या पोलादपूर विश्वस्त मैत्री ग्रुपचे उदय खरे यांच्यासहित शृंगारतळीचे कासम सालेह, दापोलीचे किरण पावसे, जळगांवचे संदीप देसाई, खेडचे सुरेश पवार, मार्गताम्हाणेचे मनोहर चव्हाण, संगमेश्वरचे संजय शिंदे या आरोग्यसमाजसेवक व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *