शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकारानं पेण तालुक्यात उद्यम सखी मेळावा

Mahendra dalavi pen programe
पेण :
शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकाराने दिवाळी महोत्सवाच्या निमित्ताने मागील तीन वर्षांपासून पेण तालुक्यातील महिला उद्योजकांसाठी मोफत व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे तालुक्यात अनेक महिला उद्योजक उदयास आले असून त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस प्रगती करत आहे, असे गौरवोद्गार आमदार महेंद्र दळवी यांनी उद्यम सखी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी काढले. मेळाव्याचे उद्घाटन आदीती दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्यम सखी उपक्रमामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून इतर अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हे यश शिवसेना महिला आघाडीच्या आदीती दळवी व अंजली जोगळेकर यांच्या पुढाकारामुळे शक्य झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Nca1

पेण तालुक्यातील शिवसेना संघटनेचे सामाजिक कार्य तळागाळापर्यंत पोहोचले असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडवले आहेत. दिवाळीनंतर नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन आमदार महेंद्र दळवी यांनी केले. पेण येथील महात्मा गांधी मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात 11 व 12 या दोन दिवसांसाठी सुमारे ५० महिलांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *