शिर्डी साई भक्तांसाठी महत्त्वाची बातमी: देणगीनुसार मिळणार खास सुविधा, नवं धोरण जाहीर

शिर्डी साई संस्थानचा महत्त्वाचा निर्णय: साईभक्तांसाठी ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
शिर्डी साईबाबा संस्थानतर्फे साई भक्तांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देणगीदार भक्तांना आता त्यांच्या देणगीच्या रकमेप्रमाणे विशेष सुविधा मिळणार आहेत. संस्थानच्या तदर्थ समितीने हे सुधारित Facility Policy मंजूर केलं आहे, ज्यात भक्तांना आरती पास, प्रसाद, पूजेचे कूपन्स, सन्मानचिन्हे आणि व्हीव्हीआयपी दर्शन यांसारख्या सुविधा मिळणार आहेत.
📝 देणगी आणि त्यानुसार सुविधा:

🔹 ₹10,000 ते ₹24,999:
→ 5 सदस्यांसाठी एक वेळचा आरती पास.
🔹 ₹25,000 ते ₹50,000:
→ 2 वेळा दर्शन/आरती पास,
→ थ्रीडी पॉकेट फोटो,
→ 5 उदी पाकिटे,
→ 1 साई चरित्र,
→ 2 लाडू प्रसाद.
🔹 ₹50,001 ते ₹99,999:
→ 2 व्हीव्हीआयपी आरती पास,
→ सन्मानचिन्हे.
🔹 ₹1 लाख ते ₹9.99 लाख:
→ पहिल्या वर्षी 2 आणि नंतर प्रत्येकी 1 व्हीव्हीआयपी पास,
→ एक वेळचं मोफत दर्शन,
→ सन्मान शॉल,
→ 3 फोटो,
→ पूजेचे कूपन,
→ भोजन पास,
→ वस्त्र व प्रसाद भेट.
🔹 ₹10 लाख ते ₹50 लाख:
→ दरवर्षी 2 व्हीव्हीआयपी आरती पास,
→ एक वेळ प्रोटोकॉल दर्शन,
→ साईबाबांना वस्त्र अर्पणाची संधी,
→ साई मूर्ती,
→ भोजन पास.
🔹 ₹50 लाखांहून अधिक:
→ आयुष्यभर दरवर्षी 3 व्हीव्हीआयपी आरती पास,
→ 2 प्रोटोकॉल दर्शन पास,
→ साई मूर्ती,
→ वस्त्र अर्पण,
→ सन्मान चिन्हे,
→ भोजन पास.
या धोरणामुळे साईभक्तांना त्यांचं योगदान अधिक सन्मानाने परत मिळणार आहे, अशी माहिती संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *