दुर्दैवी अपघात : एका तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; ‘आमची माती आमची माणसं’कडून 100 हेल्मेट वाटपाचा संकल्प

पनवेल परिसरात भीषण अपघातांची मालिका: तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू
पोलादपूर (शैलेश पालकर) : 
 तालुक्यातील चोळई येथील दोन तरुण मोटरसायकलने महाबळेश्वर रस्त्यावरील कापडे बुद्रुक भागातून परत येत असताना झालेल्या अपघातात एकाच जागेत मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी दुपारनंतर झाला आहे. गेल्या काही महिन्यातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर आमची माती आमची माणसं संघटना 100 हेल्मेट वाटप करणार असल्याचा संकल्प संस्थापक राजपालटे व अध्यक्ष निलेश कोळसकर यांनी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे व पोलीस निरीक्षक रावडे यांची भेट घेऊन जाहीर केला आहे.
कापडे बुद्रुक हद्दीतील हॉटेल श्रद्धा समोरील रस्त्यावर अचानक पोलादपूर बाजूकडून एक वाहन आल्याने मोटरसायकलवरील (क्रमांक-एमएच 06 सीआर 8064) राज विनोद कदम (17वर्षे) याने मोटर सायकल वरून उडी मारली. यामुळे मोटार सायकल स्वार आदित्य सतीश पवार याचा वाहनावरील ताबा सुटला आणि मोटार सायकल वरून साईड पट्टीच्या दिशेने गेली.
यावेळी राज विनोद कदम याच्या जागीच मृत्यू झाला तर मोटार सायकलस्वार आदित्य पवार हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत आणि जखमीला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणी पोलीस हवालदार नितेश कोंढाळकर हे पोलीस निरीक्षक आनंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये मोटार सायकल वरून प्रवास करणाऱ्या तरुणांच्या जीवावर वेतनावे अभ्यास घडल्याच्या घटनांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच पोलादपूर तालुक्यातील आगळगण्य सामाजिक संघटना आमची माती आमची माणसं तर्फे संस्थापक राजपालटे आणि निलेश कोळसकर हे तालुक्यातील मोटार सायकलस्वार तरुणांसाठी शंभर हेल्मेट वाटप करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *