विश्वनाथ धामणसे आदर्श सरपंच पुरस्कारांनी सन्मानित

Vishwanath sarpanch
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील डोळवहाल गावचे सुपुत्र सामाजिक शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले ऐनवहाळ ग्राम पंचायतीचे सरपंच विश्वनाथ धामणसे यांना नामवंत अशा नालंदा ऑर्गनायजेशन या संस्थेच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल्याने ऐनवहाळ पंचक्रोशी सह सर्वत्र अभिनंदन व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लोककल्याणासाठी सदैव तत्पर असलेल्या नालंदा ऑर्गनायजेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था ‘कला आणि विद्याशिक्षण’ क्रांतीचा केंद्रबिंदू.म्हणून मोठी ओळखली जात असून शाश्वत शेती मार्गदर्शन तसेच कार्यशाळा असे उपक्रम राबवत असून यांच्या वतीने महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा तसेच विविध आदर्श व्यक्तिमत्त्वाचा सन्मान या संस्थेच्या वतीने करण्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात येत असून रोहा तालुक्यातील ऐनवहाळ ग्राम पंचायतीचे सरपंच विश्वनाथ बाबू धामणसे यांना त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कामगिरीबद्दल यंदाचा आदर्श सरपंच नालंदा ऑर्गनायजेशन संस्थेकडून सर्वेक्षणा दरम्यान महाराष्ट्र रत्न सरपंच पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पत्रकार भवन, नवी पेठ पुणे येथे १९ एप्रिल रोजी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी.डॉ. शेषराव हिम्मतराव पाटील,आय.एफ.एस अधिकारी,जितेन्द्र तुळशीराम दाते. अध्यक्ष ए आर जे ग्रुप इंडस्ट्रीज,प्रा. मनोज शिवाजी वाबळे अध्यक्ष-शब्दधन सोशल फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते विश्वनाथ धामणसे यांना सहकुटुंब उपस्थित हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे ग्राम पंचायत स्तरावर तसेच विविध स्तरावर तसेच खांब कोलाड विभागात त्यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *