रोहा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावत

कोलाड | श्याम लोखंडे
रायगड जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत रोहा तालुक्यातील आंबेवाडी जि.प.गट आणि पंचायत समिती गणात राष्ट्रवादी (अजित पवार गट)चा प्रचाराचा झंझावात तसेच अजितदादांच्या साखळीत राष्ट्रवादी उमेदवारांचा त्याच बरोबर त्याच्या सोबत युतीतील असलेले भाजप कार्यकर्ते यांचा गावोगावी उमेदवारांसह प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) आणि महायुतीतील प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला असून तालुका पातळीपासून गावपातळीपर्यंत पक्षाच्या झेंड्यांचा, घोषणांचा आणि कार्यकर्त्यांच्या उसळलेल्या उत्साहाचा अफाट असा झंझावात कार्यकर्त्यांसह महिलांचा उत्साह अधिक शिगेला उठला आहे. अजितदादांनी आणि लोकप्रिय खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार घराघरात जाऊन संवाद साधत असून आपल्या उमेदवारांना बहुमतांनी विजय करून घेण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
आंबेवाडी जिल्हा परिषद गटातून निधी नरेंद्र जाधव, तर पंचायत समिती गणात संजय मांडुळस्कर तसेच कोलाड पंचायत समिती गणातून जगन्नाथ धनावडे हे राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत असल्याने त्यांना निवडून आणण्यासाठी पहाटेपासून उशिरापर्यंत निघणाऱ्या पदयात्रा, ठीक ठिकाणी गाव बैठका सभांमधून स्थानिक प्रश्नांवर चर्चा होत असून तरुण कार्यकर्त्यांची महिलांची मोठी फौज प्रचारात आघाडी घेत आहेत.तसेच सोशल मीडियावरूनही प्रचाराचे जोरदार मोहीम राबवत असल्याचे दिसून येत आहे.प्रत्येक गावात अजित पवार गटाच्या झेंड्यांनी आणि फलकांनी चौक, बाजारपेठ सजल्या असून “विकासासाठी मतदान” या घोषणेभोवती प्रचार मोहीम फिरताना दिसत आहे.महिला बचतगट, शेतकरी बांधव, तरुण मतदार यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करत उमेदवार स्वतः मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.
येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून उमेदवारांसोबत जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील प्रमुख नेते दिवसभर विविध मतदारसंघात जाहिर सभा, कार्यकर्ता मेळावे घेत असून उमेदवारांना संघटनात्मक पाठबळ देत आहेत.अनेक ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून केलेल्या शहरी तसेच ग्रामीण भागात रस्ते, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कामांची माहिती पत्रके सोबत मतदार यांची ओळख पत्रक वाटून मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे. शेवटचा परिच्छेदया झंझावाती प्रचारामुळे जिल्ह्यातील निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली असून राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीचे उमेदवार विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त करत आहेत. आगामी उर्वरित दोन तीन दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असून रोहा तालुक्यातील चार जिल्हा परिषद पदाचे उमेदवार तसेच पंचायत समितीचे आठ उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते तसेच युवक आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात प्रचारात उतरलेले पहावयास मिळत आहे.