काळ कुणासाठी थांबत नाही, चिंतनामध्ये वेळ घालवावा – शिवशाहीर ह.भ.प.अमित महाराज बळवली

भाकरवड | जीवन पाटील
अलिबाग तालुक्यातील भाकरवड गावच्या स्व. सहिंद्रा पांडुरंग पाटील यांचे सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या तेराव्या निमित्ताने दि 31 जानेवारी 2026 रोजी शिवशाहीर ह .भ. प .अमित महाराज बळवली पेण यांनी सुसाव्य कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी भाकरवड, देहेन पंचक्रोशीतील जवळजवळ सातशे हूनआदिक भाविक भक्तांनी कीर्तन रुपी सेवेचा आस्वाद घेतला.
यावेळी रायगड भुषण शशिकांत महाराज, आगरी भूषण ह भ प महेंद्र जुईकर, ह भ प आदर्श शिक्षक ह भ प जगन्नाथ महाराज राऊत , तसेच संप्रदाय मंडळी देहेन यांनी साथरूपी संगत दिली मृदुंगाची साथ भागवत महाराज खरात यांनी केले आपल्या कीर्तन सेवेत ह .भ. प .अमित महाराज यांनी देहईश्वर समंधाने विवेचन केले. काळ वेळ कुणासाठी थांबत नाही जर आपण चिंतनामद्ये ,परमेश्वर भक्तीत असू तर आपले जीवन साध्य करू शकतो इहलोक परलोक सफल ठरू शकतो असे विवेचनात म्हटले . प्रवचन , कीर्तन हरीजागर होणे म्हणजे अशा मोजक्याच ठिकाणी पार पडतात जेथे नामकीर्तन हरिनाम हरिजागर मोठ्या उत्साहात संपन्न होतो.
यावेळी भाकरवड देहेन गावातीळ वारकरी संप्रदायाचे भावीक भक्तगणांनी सामाजिक,आध्यात्मिक,शैक्षणिक , कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेत वारकरी संप्रदायाचे रोपटं अजूनही जिवंत ठेवलं आहे त्यांच्या तेराव्या पित्यर्थ या संपूर्ण पाटील परिवाराने कीर्तन रुपी सेवेचा कार्यक्रम आयोजित करून यावेळी संपूर्ण भाकरवड परिसर एक भक्तिमय वातावरणात डुंबून गेला होता.