रोहा -कोलाड मार्गावर २० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संभे गावानजीक इर्टिगा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील चंद्रकांत सावंत (वय ५४ वर्ष) राहणार बंगळे आली रोहा हे कोलाड बाजू कडून रोहा बाजू कडे जात असताना. इर्टीगा गाडी क्रमांक एम एच ०४ एचएफ ९९९८ रोहा बाजूकडून कोलाड बाजूकडे जाणाऱ्या अब्दुल रहीम खान (वय वर्ष २५) दुचाकी क्रमांक एम एच ०६ बी एक्स ५९५२ यांना समोरासमोर धडक दिली व या अपघातात दुचाकी स्वार रस्त्यावर खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली ही माहिती सागर दहिंबेकर यांच्या SVRSS टीम ला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला पुढील उपचारासाठी भट नर्सिंग होम रोहा येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी केली तर पोलीस हवालदार शिर्के अधिक तपास करीत आहेत.